विखे पाटील ॲक्शन मोडवर; वाढत्या चोरीच्या घटनांवर कठोर कारवाईचे आदेश

विखे पाटील ॲक्शन मोडवर; वाढत्या चोरीच्या घटनांवर कठोर कारवाईचे आदेश

विखे पाटील ॲक्शन मोडवर; वाढत्या चोरीच्या घटनांवर कठोर कारवाईचे आदेश

अहिल्यानगर प्रतिनिधी : प्रसाद घोगरे - ९३७०३२८९४४.

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये वाढत्या चोरीच्या घटना तसेच ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्तींकडून निर्माण केली जात असलेली दहशत याच्या पार्श्वभूमीवर संगमनेर, शिर्डी आणि श्रीरामपूर तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. मात्र, कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी यंत्रणेने अधिक गांभीर्याने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या दुकाने व हॉटेल्सवर वेळेची बंधने घालावीत, रात्रीची पोलीस गस्त वाढवावी तसेच ग्रामीण भागात दिवसा आणि रात्री नियमित गस्त ठेवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे आणि स्थानिक युवकांच्या सहकार्याने ग्रामरक्षक दल सक्रिय करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

पालकमंत्री Radhakrishna Vikhe Patil यांनी पोलीस प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक सतर्क आणि प्रभावीपणे कार्य करण्याचे निर्देश दिले.