बनावट डॉक्टर तन्वीर देशमुखवर गुन्हा दाखल; रुग्णांना चुकीचे उपचार दिल्याचा आरोप*

बनावट डॉक्टर तन्वीर देशमुखवर गुन्हा दाखल; रुग्णांना चुकीचे उपचार दिल्याचा आरोप*

*बनावट डॉक्टर तन्वीर देशमुखवर गुन्हा दाखल; रुग्णांना चुकीचे उपचार दिल्याचा आरोप*

*राहुरी, दि. 15 मे 2026*: राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत बनावट डॉक्टर बनून रुग्णांवर उपचार करणाऱ्या तन्वीर हारुन देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी तन्वीर देशमुख, रा. बारागांव नांदुर, ता. राहुरी, याने राहुरी शहरातील गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्र, रोशन कॉम्प्लेक्स शेजारी, नगर-मनमाड हायवे येथे महा. कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन किंवा नॅशनल कौन्सिलकडून कोणतेही अधिकृत रजिस्ट्रेशन नसताना रुग्णांची तपासणी व उपचार केले.

12 मे 2026 रोजी चौकशीत आरोपीकडे वैद्यकीय प्रॅक्टिशनर्स ॲक्टनुसार उपचार करण्याचा अधिकार नसल्याचे, तसेच त्याने बनावट डिग्रीचे कागदपत्र सादर केल्याचे आणि "डॉक्टर" या शब्दाचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाले.

मा. दिवाणी वरीष्ठ स्तर न्यायालय, राहुरी यांनी 11 मे 2026 रोजी रेग्युलर सिव्हील सुट नं. 365/2025 मध्ये आरोपीवर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स कायदा 1961 अंतर्गत कारवाईचे आदेश दिले होते.

डॉ. गणेश बाबासाहेब मिसाळ, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय राहुरी यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. नं. 502/2026 भा. न्या. संहिता कलम 319(2), 318(4), 336(3), 340(2) सह महा. वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 34, 36, 38 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याच्या तपासात आरोपी रुग्णांवर उपचारासाठी वापरलेली औषधे बारागांव नांदुर रोड परिसरात जाळत असल्याची माहिती मिळाल्याने, पंचासमक्ष फॉरेन्सिक टीमच्या मदतीने ती औषधे जप्त करण्यात आली आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे आणि पोहेकॉ सतीष आवारे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागी

य पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.