शिवीगाळ करू नका" म्हणाल्याचा राग; फायटर व लाथा बुक्क्यांनी मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल*

शिवीगाळ करू नका" म्हणाल्याचा राग; फायटर व लाथा बुक्क्यांनी मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल*

*"शिवीगाळ करू नका" म्हणाल्याचा राग; फायटर व लाथा बुक्क्यांनी मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल*

*राहुरी, दि. 15 मे 2026 - : "तुम्ही आम्हाला विनाकारण शिवीगाळ करू नका" असे म्हणाल्याचा राग आल्याने तिघांनी मिळून दोन तरुणांना फायटर आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना 10 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास राहुरी शहरातील बारागाव नांदुर फाटा जवळ घडली.

गौंडवस्ती, रेल्वे स्टेशन, राहुरी येथील 19 वर्षीय धोनी मितुन जामकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो व त्याचे मित्र शिव चिंदबर मंगल कार्यालय येथून टेम्पोने रेल्वे स्टेशनकडे जात होते. त्यावेळी लखन लोखंडे, सुरज लोखंडे आणि किरण नावाच्या व्यक्तीने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. धोनीने विरोध केल्यावर तिघांनी मिळून त्याला व त्याच्या मित्रांना फायटर व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच "आमच्या नादी लागलात तर एका एकाचा काटा काढू" अशी धमकी दिली.

धोनी जामकरच्या फिर्यादीवरून आरोपी लखन लोखंडे, सुरज लोखंडे आणि किरण या तिघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 488/2026 भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 118(1), 351(2), 189(2), 191(1), 190, 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे

"शिवीगाळ करू नका" म्हणाल्याचा राग.

फायटर व लाथा बुक्क्यांनी मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल.

घटना: 10/05/2026 दुपारी 4 वाजता, बारागाव नांदुर फाटा येथे घडली 

_राहुरीत "शिवीगाळ करू नका" म्हणाल्याचा राग आल्याने तिघांनी दोन तरुणांना फायटर व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. घटना 10/05/2026. 

राहुरी तालुका प्रतिनिधी   - देवेंद्र शिंदे