*राहुरी पोलिस स्टेशन पथकाने 08 महिन्यापासून फरार आरोपीतास घेतले ताब्यात*

*राहुरी पोलिस स्टेशन पथकाने 08 महिन्यापासून फरार आरोपीतास घेतले ताब्यात*

   राहुरी पोलीस स्टेशन आदित देवळाली प्रवारा येथे दिनांक 26/03/2025 रोजी देवळाली प्रवरा येथे माजी नगर अध्यक्ष सत्याजी चंद्रशेखर कदम यांच्यावर काही इसमांनी गैर कायद्याची मंडळी जमा करून कटकारस्थान करून जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला वगैरे मजकूर गुन्हा रजिस्टर क्रमांक 377/2025बी एन एस कलम 109,61(1),119(1),189(2),191(3),190 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीत नामे खंड्या उर्फ विजय बाळू इथापे राहणार देवळाली प्रवारा यास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस हवालदार राहुल यादव, पोलीस कॉन्स्टेबल गणेश लीपने, पोलीस नाईक प्रवीण अहिरे, पोलीस नाईक रोकडे यांनी गुप्त बातमी द्वारा मार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणच्या आधारे सदर आरोपीतास ताब्यात घेऊन तक करून मा. न्यायालयात हजर करीत आहोत.

                सदर कारवाई मा. सोमनाथ घार्गे पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर , मा. सोमनाथ वाघचौरे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर , मा. जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, पोसई राजु जाधव, पोहेकॉ / राहुल यादव , पोकॉ. गणेश लिपने, पोकॉ. सचिन ताजने, पोना अहिरे, पोना रोकडे यांनी केली आहे सदर गुन्हयाचा तपास पोसई / राजू जाधव, पोकॉ. गणेश लिपने हे करीत आहेत.