बऱ्हाणपूर येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा मुजोरपणा ग्राहकांना नियमानुसार धान्य वाटप न करता.अफरा-तफर करुन व्यापाऱ्यांना माल विकताना रंगेहात पकडले.
बऱ्हाणपूर येथील स्वस्त धान्य दुकानदारला गावातील नागरिकांनी गहू तांदूळ व्यापाऱ्यांना विकताना रंगेहात पकडले.
रेशन दुकानदाराचा मुजोरपणा ग्राहकांना देत नाही नियमानुसार धान्य आणि अन्यतर विकतो व्यापाऱ्यांना माल.
शेवगाव तालुका प्रतिनिधी. यशवंत पाटेकर.
अहमदनगर:शेवगाव तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील रेशन दुकानदाराचा मुजोरपणा अरे वारीची भाशा रेशन कार्ड धारकांना वेळेवर व रितसर धान्य न देण्याचा प्रकार बऱ्हाणपूर येथील प्रकार नागरिकांन समोर आला आहे.गावातील नागरिकांनी स्वत दुकानदार श्री.अच्युतराव गणपत दिवटे रा.बऱ्हाणपूर व शेवगाव येथील व्यापारी श्री. गायकवाड यांना गहू,तांदूळ विकताना रंगेहात पकडले. स्वस्त धान्य दुकानदार श्री. दिवटे यांना गावातील नागरिकांनी पकडले,असून शेवगाव पुरवठा विभाग व तहसिलदार यांनी योग्य ती कारवाई करून त्या मुजोर दुकानदारचा परवाना रद्द करून त्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.यावर वरिष्ठांनी दखल घेऊन कारवाईची मागणी होत आहे.शेवगाव तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील दुकानदार अच्युतराव गणपत दिवटे दुकान न.60 या छोटयाक्षा खेड्यागावात बाहेरगावाचे व्यक्ती व्यापारी येऊन गावातील गोरगरीब जनतेच्या व नागरिकांच्या वाट्याचा माल स्वस्त धान्य दुकानदर त्यांना राजरोस पणे विकतो.बऱ्हाणपूर स्वस्त धान्य दुकानदार मालक हे महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात फक्त चार दिवस दुकान उघडी ठेवून माल वाटप करतात.त्यामुळे गावातील नागरिकांना कामधंदे बुडवून रेशन घेण्यासाठी दिवसभर ताटकळत रांगेत थांबावे लागते.तसेच महाराष्ट्र शासनाने चालू केलेल्या योजनेद्वारे दुकानातील दुकानदार हे आम्हा ग्रामस्थांकडून दिवाळीसाठी शासनाने दिलेला आनंदाचा शिधा 100 रुपयांना असताना तुम्ही 110 रुपये कसे घेतात.असे ग्रामस्थांनी विचारले असता त्यांनी आम्हाला सांगितले की, हे माझे दुकान आहे.आणि इथे प्रत्येक वस्तूची किंमत मिच ठरवतो.जर तुम्हाला धान्य घ्यायचे असेल तर घ्या नाहीतर मी तुमचे रेशन कार्डच रद्द करून टाकील.माझे वरती पुरवठा निरीक्षक सोबत संबंध आहेत.तसेच पुरवठा निरीक्षक यांना माझ्या दुकानातून हप्ता चालू आहे त्यामुळे माझे कुणी काही वाकडे करणार नाही. याबाबत जर तुम्ही कोणाकडे तक्रार केली तर मी अपंग आहे.मी तुमच्यावर पोलीस स्टेशन मध्ये अपंग व्यक्तीचा छळ केला म्हणून खोट्या तक्रारी दाखल करील.अशा प्रकारे बऱ्हाणपूर येथील स्वस्त धान्य दुकानदार श्री. दिवटे हा गावातील ग्रामस्थ व नागरिकांना धमकावत आहे.दुकानावर दुकान क्रमांक फलक व नियमावली नाही, लाभार्थ्यी गहू किती,तांदुळ किती येतात हे लाभार्थ्यांना समजत नसल्याने प्रत्येक लाभार्थीयला धान्य एक ते दोन किलो कमी वाटप करण्यात येते,सदरील दुकानदार हा अतिशय लबाड वृत्तीचा असून आम्हास धान्य किती मिळाले. याबाबतची कोणतीही पावती आम्हास देत नाही.तसेच तो धान्याचे जास्त पैसे बळजबरीने लुटतो आहे.व महिन्यातून फक्त चारच दिवस दुकान सुरू ठेवतो.महाराष्ट्र शासनाने मोफत नागरिकांना शिधावाटप योजना चालू केली आहे.त्याचेही गोरगरीब जनतेकडून पैसे घेऊन धान्य वाटप करतात. दिनांक 20.11.2023 रोजी सकाळी सदरचे दुकानात दोन अनोळखी व्यक्ती शासनाने दिलेल्या तांदुळाच्या पोत्यातून काढून एका काळ्या रंगाच्या गोणीत भरत होते. हे गावातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यावेळी सदर घटनेबाबत दुकानदाराकडे चौकशी केली,असता त्यांनी सांगितले तुम्हाला काय करायचे आहे.हे माझे दुकान आहे. मी कोणालाही धान्य देईल,विकीन तुम्हाला जे करायचे ते करा. तहसीलदार साहेब माझ्या ओळखीचे आहेत.तुम्ही कुठेही तक्रार करा मला काही फरक पडणार नाही.त्यानंतर आम्ही सदरच्या बाबीची मोबाईल रेकॉर्डिंग चालू केली.व त्या अनोळखी व्यक्तींना विचारपूस केली की तुम्ही लोक तर आमच्या गावचे दिसत नाहीत.तुम्ही हे धान्य कोठे घेऊन जातात त्यावर त्यांनी सांगितले की, आम्ही शेवगाव येथील गायकवाड आहोत.तुम्ही रेकॉर्डिंग बंद करा.असे म्हणून त्यांनी दुकानातून पळ काढला.तरी याबाबतची रेकॉर्डिंग विडिओ शूटिंग आम्ही आपणास तहसीलदार साहेब व पुरवठा अधिकारी मॅडम यांना या अर्जासोबत कारवाई करण्यासाठी पेन ड्राईव्ह मध्ये आम्ही नागरिक देत आहोत.अशा प्रकारे गावामधील दुकानात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून दुकानदाराची चौकशी करुन कडक शासन करून सदरील दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा. अशी मागणी गावातील नागरिकानी तहसिलदार साहेब व पुरवठा अधिकारी मॅडम यांना तक्रारीत मागणी केली आहे.पुरवठा अधिकारी मॅडम यांनी तात्काळ चौकशी करून कारवाई करावी.