*श्री समर्थ निवासी प्राथ. व माध्य. विद्यामंदिर आश्रमशाळा कासारवाडी येथे नूतन विद्यार्थी इमारत लोकार्पण सोहळा आ. राजेंद्र राऊत यांच्या हस्ते संपन्न.*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
दि.21-08-2022 वार-रविवार बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते कासारवाडी येथील आश्रम शाळेत नवीन विद्यार्थी इमारत लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार राऊत यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार राज्यस्तरीय A.T.S. प्रज्ञाशोध परीक्षा यामध्ये कोरफळे केंद्रात द्वितीय क्रमांक मिळवणारी प्रणया विनोद खुने या विद्यार्थिनीला ट्रॉफी व प्रशस्तीपत्र व सन्मान चित्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गुरुदेव दत्त भाऊ देशी संस्था बार्शी संचलित मुकुंद शिंदे यांनी केले
यावेळी आमदार राऊत म्हणाले की, श्री समर्थ निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा कासारवाडी बार्शी तसेच या शाळेसोबत 165 आश्रम शाळा यांना पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ मार्च 2019 रोजी 20 टक्के अनुदान जाहीर केले. परंतु तत्पश्चात अध्याप करणे देखील कोणत्याही कर्मचाऱ्यांना वेतन नाही या आदी या सर्व शाळांच्या दोन वेळेस तपासण्या समाज कल्याण अंतर्गत करून घेण्यात आल्या. पण सरकारचे धर सोड त्यामध्ये कोरोनाचे सावट यामुळे 165 आश्रम शाळेवरील कर्मचाऱ्यांची होत असलेली हेळसाण माझ्या निदर्शनास आली आहे. शाहू, फुले, आंबेडकर योजनेअंतर्गत 165 आश्रम शाळांना सध्या कार्यरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी पाठपुरावा करून लवकरात लवकर मी शंभर टक्के अनुदान मिळाली याचा प्रयत्न करेल. लवकरात लवकर सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड कशी होईल या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करून या कॅबिनेटला लवकरात लवकर विषय घेऊन शासन स्तरावर याचा पाठपुरावा करून सर्व शाळांची कामे मार्गस्थ लावतो असेही आमदार यांनी म्हणाले.
या शाळेसाठी 700 मीटरचा रस्ता या दसरा-दिवाळीच्या अगोदर करून मार्गी लावतो व या आश्रम शाळेस अक्षय प्रकाश योजनेअंतर्गत लाईट कनेक्शन विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी स्वस्त धान्य दुकान रेशन कार्ड माझ्या स्तरावर मार्गे लावून देतो असा शब्द आमदार राजेंद्र राऊत या कार्यक्रमा वेळी दिला.
यावेळी उपस्थित सर्व व्यासपीठावर बसलेले मान्यवर, शाळेचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षिका वृंद विद्यार्थी-विद्यार्थिनी व सर्व कर्मचारी तसेच कासारवाडीतील सरपंच, उप-सरपंच, पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी तालुका संपर्क प्रमुख व आदी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.