*मालवाहू पिकअप ची धडक*  दोन चिमुकल्या बहिणी अपघातात ठार ,आई-वडिलांसह तिसरी बहीण गंभीर जखमी

          *मालवाहू पिकअप ची धडक*

 दोन चिमुकल्या बहिणी अपघातात ठार,आई-वडिलांसह तिसरी बहीण गंभीर जखमी

     काटोल :- ( कोंढाळी ) नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी (ता.काटोल) नजीकच्या दुधाळा परिसरात शनिवारी (दि.२०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास मालवाहू पिकअपची दुचाकीला धडक बसून अपघात झाला.

          रक्षाबंधनासाठी कोंढाळी ला येत असताना दांपत्याच्या मोटरसायकल ला मालवाहू पिकअप वाहनाने मागून जोरात धडक दिली या अपघातात एक वर्ष चिमुकलीसह तीच्या तीन वर्षीय बहिणीचा मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील व एक बहीण गंभीर जखमी झाली झाली. निहारीका विजय पेठे (वय १) व त्रीशा विजय पेठे (वय ३) अशी मृत बहिणीची नावे आहेत. जखमी मध्ये तिचे वडील विजय निरंजन पेठे (३५), आई पुजा विजय पेठे (३०) व बहीण श्रावणी विजय पेठे (७) या तिघांचा समावेश आहे. विजय पेठे हे वाकोडी या.सावनेर येथील रहिवासी आहे तर पुजा यांचे माहेर कोंढाळी परीसरातील असल्याने त्या विजय व तिन्ही मुलींसह एम एच 40/बीक्यू ७४८६ क्रमांकाच्या दुचाकीने कोंढाळी कडे येत होत्या.

        कोंढाळीनजीकच्या दुधाळा शिवारात मागुन वेगात आलेल्या एम एच २७/बीएक्स -०२७३ क्रमांकाच्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.त्यात निहारीका मृत्यू झाला तर तिचे आई-वडील व दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी कोंढाळी पोलीसांनी वाहनचालक मोहम्मद जावेद (२२ अमरावती) याला अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार पंकज वाघोडे करीत आहेत.