शेवगाव पोलिसांची अवैध धंद्यावर धडक कारवाई अवैध धंद्यावाल्याचे धाबे दणाणले कारवाई करून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त .

शेवगाव पोलिसांची अवैध धंद्यावर धडक कारवाई अवैध धंद्यावाल्याचे धाबे दणाणले कारवाई करून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त .

शेवगाव पोलीसांची अवैध धंदयावर धडक कारवाई-अवैध धंद्यावाल्याचे धाबे दणाणले –कारवाई करुन दिड लाखाचा मुद्देमाल केला जप्त .

यां बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव पोलीस स्टेशनचे मा.पोलीस निरिक्षक विलास पुजारी यांनी वेगवेगळे तिन पथके बनवुन शेवगाव तालुक्यातील विविध ठिकाणी छापे टाकले आहेत.सदर छाप्यानं मध्ये शेवगाव तालुक्यातील रांजणी गावातील अनुसया विश्वास पवार रा.रांजणी ता.शेवगाव यांचेकडुन 52,000/- रु किंमतीचे त्यात 60 लिटर तयार हातभट्टी दारु प्रत्येकी 100 रु लिटर दरा प्रमाणे.व 575 लिटर हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायण प्रत्येकी 80 रु लिटर दरा प्रमाणे जप्त केले आहे.तसेच भाविनिमगाव गावातील अर्जुन व्यंकु शिंदे रा.भाविनिमगाव ता.शेवगाव यांचेवर छापा टाकुन त्याचेकडुन 50,000/- रु किंमतीचे त्यात 80 लिटर तयार हातभट्टी दारु प्रत्येकी 100 रु लिटर दरा प्रमाणे.व 500 लिटर हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायण प्रत्येकी 80 रु लिटर दरा प्रमाणे जप्त केले आहे.तसेच सोनेसांगवी गावातील भागिरनाथ मारुती पवार रा.सोनेसांगवी ता.शेवगाव यांचेवर छापा टाकुन त्यांचेकडुन 10 लिटर गावठी हातभट्टी तयार दारु जप्त करण्यात आली आहे.खामपिंप्री गावातील बाळासाहेब रावसाहेब जगधने याचेवर छापा टाकुन त्यांचेकडुन 6 देशी भिंगरी संञा देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.व बोधेगाव गावातील आकाश कैलास चव्हाण रा.बोधेगाव ता.शेवगाव यांचेवर छापा टाकुन त्याचेकडुन मटक्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.तसेच शेवगाव गावातील प्रविण अरुण भारस्कर रा.भारस्करवाडी ता.शेवगाव यांचेवर छापा टाकुन त्यांचेकडुन मटक्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे.व सामनगाव गावातील हनुमंत अंकुश झाडे रा.सामनगाव ता.शेवगाव यांचेवर छापा टाकुन त्याचेकडुन देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

वरिल सदरची कामगिरी हि मा.पोलीस अधिक्षक राकेश ओला व अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे ,व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शना खाली मा.पोलीस निरिक्षक विलास पुजारी सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री आशिष शेळके, सहाय्यक पोलीस निरिक्षक सो विश्वास पावरा साहेब, पो.हे.कॉ. परशुराम नाकाडे,पो.हे.कॉ. नानासेहब गर्जे, पो.हे.कॉ. पाडुरंग विर,पो.ना. अभयसिंग लबडे, पो.ना. रविंद्र शेळके, पो.ना. उमेश गायकवाड, पो.ना. किरण टेकाळे, पो.ना. सुखदेव धोञे,पो.ना. शहाजी आधळे, पो.ना. संतोष धोञे, पो. कॉ. सचिन हाडके, पो. कॉ. सचिन खेडकर, पो. कॉ. संपत खेडकर, चालक पो.ना. संभाजी धायतडक, म.पो.कॉ.कल्पना गावडे यांनी केली आहे.

शेवगांव शहरासह तालुक्यातील जोमात चालणाऱ्या परमिट आणि अवैध दारु विक्रीकरणाऱ्या काही हॉटेल मध्ये डुप्लिकेट दमनं ची दारु जोरात विक्री सुरु आहे दारुडे म्हणतात कितीही पिली तरी चढतच नाही हे भामटे कोण हे सुद्धा शेवगांवचे कर्तव्यदक्ष पोलीस आणि दारूबंदी विभाग नेवासा शेवगांव लवकरच शोधुन काढतील अशी अपेक्षा सर्वसामान्य शेवगांवकर करत आहेत 

मागे शेवगावच्या शेजारच्या तालुक्यात बनावट ब्रँडेड दारु बनवणारा कारखाना पकडला होता तस तर काही पुन्हा सुरु झाले नाही ना बिचारे दारु पिणारे ओरिजनल दारूचे पैसे देऊन घोड्याचे मुत पितात की काय .