*बार्शीचे उमेश आनेराव यांना पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र बॉडी मध्ये आजीवन सभासत्व*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी (ता.बार्शी) पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा. रवी सर फडणवीस यांच्या आदेशानुसार, बार्शी तालुका विभाग प्रमुख- उमेश आनेराव यांना पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र बॉडी मध्ये आजीवन सभासत्व देण्यात आले. आनेराव हे ह्या संघामध्ये गेल्या तीन ते चार वर्षापासून या संघामध्ये विश्वासाने तन-मन-धनाने व निस्वार्थ भावनेने कार्य केल्याबद्दल त्यांना हे आजीवन सभासत्व देण्यात आले. त्यांनी सांगितले की पोलीस जाणीव सेवा संघाशी एकनिष्ठ राहून कार्य करील आणि त्यांनी दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असेही ते म्हणाले.
पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्याकडून तसेच बार्शी शहर व तालुका पदाधिकारी सदस्य व महिलावर्ग यांच्यावतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.