मृदा व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी साधला लहान मुलांशी संवाद .
प्रतिनिधी:-खेडले परमानंद ,नेवासा
शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद येथे मृदा व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी भेट दिली . यावेळी त्यांनी लहान मुलांशी संवाद साधला.
त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले शाळा कशी चालू आहे ,सर्व काही व्यवस्थित आहे का?
रोज शाळेत येता का? रोज अभ्यास करायचा!
अशाप्रकारे गावातील लोकांना सोडून लहान मुलांशी चर्चा करताना बघून गावातील सर्वांनाच कौतुक वाटले.
त्याच बरोबर मुख्याध्यापिका सविता आव्हाड व शिक्षक संतोष निमसे यांच्याशी शाळेतील प्रश्नांविषयी चर्चा करून सविस्तर आढावा घेतला. वकार्यक्रमासाठी ते पानेगाव या ठिकाणी गेले.