*बार्शी तालुक्यातील कासरवाडी येथे पोलीस जाणीव सेवा संघाच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन स.पो.नि. शिवाजी जायपत्रे यांच्या हस्ते.*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
कासारवाडी(ता.बार्शी) दि.19-04-2022 वार-शुक्रवार.
पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. रवी सर फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस जाणीव सेवा संघाची बार्शी तालुक्यात कासारवाडी या ठिकाणी तिसऱ्या शाखेचे उद्घाटन बार्शी तालुका सहा.पोलीस निरीक्षक मा.शिवाजी जायपत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शाखेचे मुख्य कारण म्हणजे पोलीस बांधवांना सहकार्य करणे तसेच अंध, अपंग, शालेय विद्यार्थी व नागरिकांना मदत करणे हे होय. पोलीस बांधवांना कसल्याही प्रकारची गरज भासल्यास हा संघ प्रत्येक वेळी तत्पर असतो. जयंती मध्ये बंदोबस्त असो व इतरत्र पोलीस स्टेशनमध्ये कसले प्रकारचे कार्य असो त्या ठिकाणी हा पोलीस जाणीव सेवा संघ निस्वार्थ भावनेने कार्य करत असतो.
या उद्घाटन प्रसंगी स.पो.नी जायपत्रे म्हणाले की, पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी टीम ही प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासनाला मदत करते. त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस आमचे पोलीस बांधव चेक पोस्टवर ड्युटी करत होते त्यावेळेस या संघाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःची पर्वा न करता पोलीस बांधवांना पूर्ण बार्शी तालुक्यामध्ये चहा-नाश्ता-पाणी याची व्यवस्था केली. बार्शी तालुक्यामध्ये ग्राम सुरक्षा दलासाठी या संघाने 100 काट्या व 100 शिट्ट्या वाटप केल्या. अशा प्रकारचे अनेक कार्य या संघटनेच्या माध्यमातून होत असतात. या संघाला कसल्याही प्रकारची गरज भासल्यास आमची, पोलीस प्रशासनाची साथ मदत केव्हाही राहील असेही मा जायपत्रे म्हणाले.
या उद्घाटनाच्या वेळी बार्शी तालुका पो.ह.हर्षवर्धन वाघमोडे यांची उपस्थिती होती. तसेच कासारवाडी गावचे सरपंच-अश्विनी मंडलिक, उपसरपंच- जितेंद्र गायकवाड, पोलीस पाटील- महेंद्र पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष- शरद गुंड, ग्रामपंचायत सदस्य- सुधीर शिंदे, विनोद थोरात, प्रतिष्ठित नागरिक- बलभीम सुतार, नितीन मंडलिक, बाजीराव मंडलिक, परमेश्वर पाटील व सर्व प्रतिष्ठित नागरिक व महिला उपस्थित होते. या संघाच्या वतीने सर्वांचा सत्कार समारंभ करण्यात आला .
पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी तालुका विभाग प्रमुख- उमेश आनेराव, उपविभाग प्रमुख- समाधान विधाते, तालुका संपर्क प्रमुख- सम्मेद तरटे, तालुका कार्याध्यक्ष- संतोष दराडे, ता.संघटक शिवलिंग बुके, शहराध्यक्ष- अभिजीत माळी, उपाध्यक्ष- विजय माळी, बळेवाडी उपाध्यक्ष- धीरज सोनवणे, प्रमुख सदस्य- दत्ता माने, रमेश कानडे, अभिषेक लाला, गणेश सातारकर, संतोष घोंगाणे, गणेश यमगर, बार्शी तालुका अध्यक्षा- सुप्रिया काशीद, तालुका उपसंपर्कप्रमुख- अमृता आनेराव, तालुका सहकार्य अध्यक्षा- सारिका आनेराव, सहसंघटक- रेणुका जाधव, शहर अध्यक्षा- मनीषा साळुंखे, उपाध्यक्षा- कौशल्य राऊत, बळेवाडी महिला अध्यक्षा- वर्षा तरटे, सह संघटक- भाग्यश्री भोंडवे, कार्याध्यक्ष- राधा घोंगाने, शारदा मोहिते, नीता काजळे, सुनीता मस्के, जयदेवी काकडे, पौर्णिमा काकडे, ज्योती उबाळे.
तसेच,कासारवाडी शाखाप्रमुख- प्रशांत गुंड, अध्यक्ष/ निशिकांत सुतार, उपाध्यक्ष- अमोल चौधरी, सचिव- अक्षय शिंदे, सहसचिव- विक्रांत मडके, कार्याध्यक्ष- भाऊ सरवदे, सहसचिव- चंद्रकांत कदम आदी उपस्थित होते.