मतिमंद निवासी शाळा कुर्डूवाडी येथे वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना अन्नदान करून बार्शीचे विधाते यांनी जपली सामाजिक बांधिलकी.

मतिमंद निवासी शाळा कुर्डूवाडी येथे वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना अन्नदान करून बार्शीचे विधाते यांनी जपली सामाजिक बांधिलकी.

बी पी एस लाईव्ह न्यूज सोलापूर

जिल्हा प्रतिनिधी सम्मेद तरटे

बार्शी.    दि.20-03-2023    :- राजीव स्मृती बहुद्देशीय संस्था, बार्शी संचलित "मतिमंद निवासी शाळा कुर्डूवाडी" येथे बार्शीचे उद्योजक तथा पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी तालुका उपविभाग प्रमुख मा.श्री समाधान (भैय्या) विधाते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी  आश्रम शाळेत 45 ते 50 विद्यार्थ्यांना जेवण देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी आतापर्यंत बरेच शाळा, आश्रम, संस्था या ठिकाणी  समाजासाठी काहीतरी देण लागत या उद्देशाने मदत कार्य करत असतात. शाळाच नव्हे तर इतर ठिकाणी झोपडपट्टी. अनाथ मुले, वृद्धाश्रम ह्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने एक आपला वारसा हक्क समजून मदत कार्य करत असतात.

नावासाठी नाही तर समाधानासाठी कार्य करत असतात कारण त्यांच्या नावातच समाधान आहे हे दिसून येत. सोबत त्यांची अर्धांगिनी  धर्मपत्नी सौ. रुपाली समाधान विधाते यांचा पण अशा कार्याला मोलाचा वाटा व कायम साथ असते. त्यांची मुलगी कु. स्नेहा विधाते यांना पण गोरगरिबांना मदत करण्याची आवड असते तिच्या सांगण्यावरून कित्येक गोरगरिबांना मदत केली जाते.

या मतिमंद शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी श्री समाधान विधाते यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या व त्यांना असे कार्य तुमच्या हातून सदैव घडो असे म्हणत त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

जणू या पूर्ण विधाते परिवाराने सामाजिक बांधिलकी जपण्याचा विडा उचललेला आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.

या कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका तसेच विधाते परिवार व पोलीस जाणीव सेवा संघा चे मार्गदर्शक श्री भगवान लोकरे सर व मित्रपरिवार उपस्थित होते.

तसेच पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी शहर व बार्शी तालुका सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.