काटोल येथे भिमा कोरेगाव शौर्य दिवस सजरा करण्यात आला
काटोल:- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काटोल येथील संविधान चौकात भिमा कोरेगाव शौर्य दिवस सजरा करण्यात आला.
भिमा कोरेगावची शुर भीमसैनिकानी जिंकलेली लढाई बहुजन समाजासाठी प्रेरणादायी. दिगांबर डोंगरे.
भिमा कोरेगाव मध्ये 1818मध्ये 500महार बटालियन च्या शुर भीमसैनीकानी,28000 पेशव्यांसोबत अस्तित्वासाठी लढाई जिंकुन जो इतिहास रचला तो इतिहास 1942 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वता भिमा कौरेगावला जावुन शहीद शुर भीम सैनिकांना अभिवादन करून जिवंत केला त्या दिवसापासून भिमा कोरेगावला भीम सैनीक लाखोंच्या संख्येने जावुन अभिवादन करून क्रांतीची प्रेरणा घेवुन येतात म्हणून भिमा कोरेगावाची लढाई ही बहुजन समाजासाठी प्रेरणादायी आहे. असे मत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व न प काटोल चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांनी व्यक्त केले, काटोल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील मुख्य पुतळ्याजवळ आयोजित भिमा कोरेगावच्या शहीद भीम सैनिकांना अभिवादन व शौर्याचा इतिहास कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काटोल तालुका अध्यक्ष देविदास घायवट प्रमुख मार्गदर्शक दिगांबर डोंगरे प्रमुख उपस्थितीत सुधाकर कावळे, पत्रकार नीळकंठ गजभिये, बळवंत नारनवरे ,जिवन वाहने (गुरुजी) उपस्थित होते.
यावेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करून द्वीप प्रज्वलण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी.शंकर काळभांडे दिगांबर भगत सुरेश देशभ्रतार, संभाजी सोनुले, न्यानेश्वर शेंडे ओंकार मलवे, बाबाराव गोन्डाने, नामदेव बगवे, देवेन्द्र रोकडे ,शेखर बोरकर, वैभव बोरकर सहारे, मनोहर बंडू कावळे उपस्थित होते.