काटोल ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगाचे प्रमाणपत्र व तपासणी विशेष मोहीम कार्यक्रम पार पडला..
काटोल:- नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने काटोल येथे 21 मार्च सोमवारला वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता आणि दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टर यांच्या सहकार्याने आणि जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख ,जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर कोल्हे, रुग्ण कल्याण समिती सदस्य शब्बीर शेख ,संदीप वंजारी, चंद्रशेखर चिखले ,अनुप खराडे ,तारकेश्वर शेळके, पंचायत समिती सभापती धम्मपाल खोब्रागडे, उपसभापती अनुजा खराडे, खंडविकास अधिकारी संजय पाटील ,मुख्याधिकारी संजय बोरीवार, गणेश सावरकर, मुन्ना पटेल, यांच्या प्रमुख उपस्थित स्वालंबन या ऑनलाइन पोर्टल द्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्वीक ओळखपत्र देण्यासाठी विशेष मोहीम तपासणी व निदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सर्व प्रवर्गातील एकूण 477 दिव्यांगाची डॉक्टर कडून तपासणी व निदान करण्यात आले या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर्स, कर्मचारी, परिचारिका, अधिपरिचारिका पूजा तिवारी, पूजा धुर्वे, सुरेखा पांडे , जयश्री खोडके, रवी धोटे, बाळासाहेब सुरवसे, रागिणी ढोले यांनी सहकार्य केले...