बेवारीस कुत्र्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलांचा मृत्यू

काटोल :- शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या धंतोली भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. विराज जयवार हा पाच वर्षीय मुलगा त्याच्या मोठ्या बहिणीसह घरासमोर फिरत असताना त्याच्यावर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. घाबरलेल्या विराजने धावून जात स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
मोठी बहीण जिवाच्या आकांताने आरडाओरड करू लागली. मात्र, कुत्र्याने पाठलाग करत विराजला पकडले. पाहता पाहता दहा ते बारा भटक्या कुत्र्यांनी विराजवर हल्ला केला. आणि काही अंतरापर्यंत त्याला ओढत नेलं. जवळच एका निर्माण कार्यासाठी वाळू साठवलेली होती, कुत्र्यांनी विराजला त्या ठिकाणी ओढत नेऊन त्याचे लचके तोडले. वस्तीतील नागरिक जोवर विराजला वाचवण्यासाठी धावत त्या ठिकाणी पोहोचले, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
दुःखद आणि अत्यंत दुर्दैवी घटना...मन सुन्न आणि हेलाउन टाकणारी घटना... आज सकाळी काटोल येथे घडली.