राणीगाव जि. प.शाळेत सामाजिक संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप .
-----------------------------------------------------------------------
राणीगाव जि. प.शाळेत सामाजिक संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप .
-------------------------------------------------------------------------
अमरावती - जिल्हाअंतर्गत येणारे धारणी येथील माध्यमिक मराठी शाळा राणीगाव पंचायत समिती येथे शाळेतील 258 विद्यार्थांना नागपूर येथील विविध सामाजिक संस्थेमार्फत दि.26 सप्टेंबर 2024 रोजी विविध शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
राणीगाव शाळेचे माजी मुख्याध्यापक विजय जी. धमाले यांच्या प्रयत्नातून नागपूर येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सामाजिक संस्थेतर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग , नोटबुक, पाणी बॉटल, कंपासपेटी ,चित्रकला वह्या तसेच शैक्षणिक वस्तुंचा सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. शितल पाटील संस्थापक, महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्था - नागपूर तसेच प्रमुख अतिथी बंडू आंबटकर ,सौ रंजीता तराळे , सौ बबिता धूर्वे, राहुल महाजन ,सौ समिधा इंगळे ,सौ सुषमा कळमकर ,सौ मंजू तिवारी , कु.कांचन साहू तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय धमाले यांनी तर संचालन प्रमोद भगत यांनी केले.
कार्यक्रमात विविध शैक्षणिक उपक्रम राबवल्याबद्दल शिक्षिका मनीषा विंचूरकर यांचा सत्कार करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते मुलांना साहित्य वाटप करण्यात आले.पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात साहित्य वाटप केल्याबद्दल पालकवर्गाने आनंद व आभार व्यक्त केला. कार्यक्रमाला यशस्वीरीती पारपडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम केलं.