*अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशन पदाधिकारी मेळावा बार्शी येथे संपन्न*

बी. पी. एस. राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
दि.24-07-2022 अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्यूमन राइट्स पदाधिकारी मेळावा बार्शी येथे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील बाबा खंडापूरकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
तसेच, राष्ट्रीय प्रवक्ते- सोनालीताई गुळबिले, प्रदेश अध्यक्षा- राणीताई स्वामी, प्रदेश सचिव- प्रदीप मोहिते, प्रदेश सरचिटणीस- रमेश कणबसकर, कार्याध्यक्ष- विवेक चव्हाण, जिल्हाध्यक्ष- अनमोल केवटे, ब्रिक्स ह्यूमन राइट्स चे जिल्हाध्यक्ष- सागर तांबोळकर, महिला जिल्हाअध्यक्षा- सविता भोसले यांनी आपले मनोगत मांडले. आणि संघटनेच्या कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. बार्शी शहराध्यक्ष विशाल तोडकरी यांनी संघटनेची माहिती सांगितली व बार्शी पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. तसेच सत्कारही करण्यात आला.
तालुका उपाध्यक्ष/ रेखा सरवदे, बार्शी सहर सचिव- संगीता पवार, तालुका संघटक- वैशाली ढगे, तालुका सेक्रेटरी- मनीषा आगलावे, सहसचिव- उर्मिला जाधवर, शहर उपाध्यक्ष- गंगावणे यांची नियुक्ती करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांनी महिलांना या संघटनेत सहभागी होऊन सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बार्शी तालुका अध्यक्ष- ऍड. दैवशाला जाधवर व हा मेळावा यशस्वी होण्यासाठी शहराध्यक्ष- विशाल तोडकरी, वाहतूक विभाग अध्यक्ष- शिवलिंग बुके, शहर उपाध्यक्ष- राजगोपाल मालू, उपाध्यक्ष- विजय माळी, कार्याध्यक्ष- महादेव बोराडे, संघटक- सागर काशीद आदी उपस्थित होते.
तसेच, अरविंद जाधव यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.