*पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी टीम च्या वतीने गरजू मुस्लिम बांधवांना ईद सणाचे खाद्य साहित्य वाटप.*

*पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी  टीम च्या वतीने गरजू मुस्लिम बांधवांना ईद सणाचे खाद्य साहित्य वाटप.*

बिपिएस राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर

 जिल्हा प्रतिनिधी-सम्मेद तरटे

बार्शी (ता.बार्शी.) दि.०२-०५-२०२२ रोजी      ईद सणानिमित्त गरजू मुस्लिम बांधवांना पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी च्या वतीने सणाचे खाद्य साहित्य काजू, बदाम पिस्ता, चारोळी, नारळ, शेवया, अशा बऱ्याच प्रकारचे ड्रायफूट या संघाच्या वतीने देण्यात आले.

अतिशय गरीब असलेल्या मुस्लीम बांधवांच्या घरी जाऊन त्यांच्या आणखी काही अडचणी जाणून घेऊन त्यांना मदत करण्यात आली. यामध्ये सर्वात मोलाचा वाटा पोलीस जाणीव व सेवा संघाच्या महिला बार्शी टीमने उचलला. प्रत्येक महिला पदाधिकारी सदस्यांनी अतिशय उत्सुकतेपणे व मदत कार्याच्या अनुषंगाने कार्य केले.

कसल्याही प्रकारचे जातीभेद न धरता एक मानव जात म्हणून या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. आणि मुस्लीम बांधवांनी पूर्ण पोलीस जाणीव सेवा संघातील सर्व पदाधिकारी सदस्यांचे आशीर्वाद देऊन आभार मानले.

यामध्ये बार्शी तालुका व शहर संघाचे पदाधिकारी व सदस्य सौ.रूपालीताई विधाते, अमृताताई आनेराव, सुप्रियाताई काशीद, कौशल्या ताई राऊत, रेणुकाताई जाधव, राधाताई घोंगाने, मनिषाताई लोकरे, राजश्री कदम मॅडम, मनिषाताई साळुंखे, पूजाताई सातारकर, भाग्यश्रीताई बोंडवे, वर्षाताई तरटे, वैभवीताई माळी, अर्चनाताई शिंदे, सुनीताताई मस्के, शारदाताई मोहिते इतर सर्वांनी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन साहित्य वाटप केले.