तीर्थक्षेत्र येलवाडी ग्रामपंचायतिच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात.ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप
प्रतिनिधी -येलवाडी गावातील नवीन ग्रामपंचायत इमारती चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अगोदर च्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या जागेवर च नवीन ग्रामपंचायत इमारतीचे काम करण्यात आले आहे.अतिशय सुंदर व प्रशस्त अश्या प्रकारे या इमारतीचे काम करण्यात आले असून जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची कन्या संत भागीरथी माता याच येलवाडी गावात संत मालोजी गाडे पाटील यांना दिली होती त्यामुळे येलवाडी गावाला विशेष अशी ओळख प्राप्त असून गावाला तीर्थक्षेत्र 'क 'दर्जा ही मिळाला आहे .म्हणूनच या नवीन इमारती मधे संत भागीरथी माता मालोजी गाडे यांच्या नावाने एक सभागृहाचा ही समावेश करण्यात आला आहे. गावातील सरपंच रणजित गाडे व उपसरपंच विक्रम बोत्रे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे येलवाडी ग्रामस्थांच्या वतीने कौतुक केले जात आहे.