प्लॉटिंग खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

प्लॉटिंग खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

प्लॉटींग खरेदी विक्री व्यवसायीक यांचेवर खुनी हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचेकडुन जेरबंद .

 

दिल्ली 91 बृतांत

 

          दिनांक 26/08/2023 रोजी फिर्यादी सुभाष रायभान खरड रा. देवटाकळी, ता. शेवगांव, हल्ली राहनार शास्त्रीनगर, शेवगांव, ता. शेवगांव यांनी ऊसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरुन 1) सुधिर हरिभाऊ बाबर रा. ब्राम्हण गल्ली शेवगांव, 2) सुमित सुधिर बाबर रा. सदर अशांनी चाकु, लोखंडी रॉडने खुनी हल्ला करुन गंभीर जखमी केले होते. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

 

      सदर गुन्ह्यातील आरोपी गुन्हा घडल्यापासुन फरार झालेले होते. सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करण्याबाबत राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखचे सपोनि हेमंत थोरात, पोना/रविंद्र कर्डिले संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, संतोष खैरे, पोकॉ/किशोर शिरसाठ, जालिंदर माने, चालक पोकॉ/अरुण मोरे असे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. 

 

        पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार अशांनी आरोपीची शेवगांव परिसरामध्ये तसेच आरोपींचे नातेवाईकांकडे माहिती काढुन तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदरचे आरोपी हे गुन्हा केल्यानंतर अंबड जिल्हा जालना या ठिकाणी पळुन गेलेले असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलीस पथकाने अंबड जि. जालना या ठिकाणी जावुन आरोपींची माहिती घेवुन आरोपींना ताब्यात घेवुन पुढील कार्यवाहीसाठी शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे. 

 

     सदरची कारवाई मा. राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .