शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे येथे भुईमूग पिकाच्या आखिल भारतीय वार्षिक बैठकीचे आयोजन

शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे येथे भुईमूग पिकाच्या आखिल भारतीय वार्षिक बैठकीचे आयोजन

शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे येथे भुईमूग पिकाच्या आखिल भारतीय वार्षिक बैठकीचे आयोजन

राहुरी विद्यापीठ, दि. १९ एप्रिल, २०२६

 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि भाकृअप - भारतीय भुईमूग संशोधन संस्था, जुनागढ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे येथे दि. २१ ते २३ एप्रिल, २०२६ रोजी अखिल भारतीय समन्वित भुईमूग सुधार प्रकल्पाच्या वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी महाविद्यालय, पुणे येथील शिरनामे सभागृहात दि. २१ एप्रिल, २०२६ रोजी होणाऱ्या उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे उपस्थित असणार आहेत. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उप-महासंचालक (पीक शास्त्र) डॉ. डी. के. यादव हे उपस्थित असणार आहेत. याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक (तेलबीया व कडधान्ये) डॉ. संजीव गुप्ता हे उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाच्या उपाध्यक्षपदी जुनागड येथील भाकृअप- भारतीय भुईमूग संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. के. बेरा उपस्थित राहणार आहेत.

सदर बैठकी प्रसंगी देशातील विविध १९ राज्यातून १५० पेक्षा जास्त शास्त्रज्ञ, मान्यवर उपस्थित राहणार आहे. या तीन दिवसीय बैठकीमध्ये प्रत्येक राज्यात सुरू असलेल्या भुईमूग पिकावरील संशोधनाचे सादरीकरण होणार आहे. याप्रसंगी भुईमूग पिकाच्या संशोधनावर सखोल विचारमंथन होऊन राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांसाठी नवीन शिफारशी आणि भुईमुगाचे प्रगत वाण प्रसारित करण्यात येणार आहेत. या बैठकीत इतर राज्यात भुईमूग पिकावर सुरू असलेल्या संशोधनाचे आदान प्रदान होणार आहे. या बैठकीत भुईमूग पिकावरील पुढील वर्षाच्या संशोधनाची दिशा ठरणार असल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक तथा या कार्यक्रमाचे आयोजन सचिव डॉ. प्रशांत बोडके आणि जळगाव येथील तेलबिया संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ तथा कार्यक्रमाचे सह आयोजन सचिव डॉ. दीपक दहाट यांनी दिली.

राहुरी तालुका प्रतिनिधी -  डॉ देवेंद्र शिंदे