जलजीवनाच्या कामात घोटाळा व दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईसाठी संभाजी शिंदे यांनी सुरू केलेल्या उपोषणाची प्रशासनाने तात्काळ घेतली दखल .

जलजीवनाच्या कामात घोटाळा व दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईसाठी संभाजी शिंदे यांनी सुरू केलेल्या उपोषणाची प्रशासनाने तात्काळ घेतली दखल .

         नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील जल जीवन योजनेच्या टाकीचे व पाईपलाईनचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असून टाकीच्या सिमेंट काँक्रीटवर काम झाल्यानंतर पुरेसे पाणी मारले नाही अशा विविध प्रश्नांसंदर्भात खेडले परमानंद येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संभाजी शिंदे यांनी आमरण उपोषण पुकारले होते .

      

         दिनांक पाच मे रोजी सदरचे उपोषणास शिंदे यांनी सुरुवात केली परंतु प्रशासनाच्या वतीने काही वेळातच नेवासा एमजीपीचे अभियंता धगधगे,कनिष्ठ अभियंता सौरभ तापकिरे, ओ ठेकेदार केंद्रे उपोषण स्थळी दाखल झाले.सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांच्यासह अनेक जेष्ठ ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते . ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच जावेद इनामदार व ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांनी मिळून प्रशासनाच्या वतीने उपोषण स्थळी दाखल झालेले अभियंते व ठेकेदार यांच्याशी चर्चा केली .

     

         प्रशासनाच्या वतीने आलेल्या अधिकाऱ्यांकडून समक्ष लेखी स्वरूपात मुदतीत काम करून देण्याचे लेखी आश्वासन घेतले.त्यानंतर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांनी अभियंते धगधगे व ग्रामस्थ यांच्या हस्ते उपोषण सोडले .

         

          यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते यामध्ये,सूर्यभान आघाव ,दादासाहेब रोठे , राजाबापु शिंदे , मोहम्मद भाई इनामदार ,दगू बाबा हवालदार , रविंद्र अशोक केदारी ,कुंडलिक बर्डे , कारभारी शिंदे ,भानुदास शिंदे , श्यामसुंदर केदारी,फकीर मोहम्मद शेख,अब्दुल हवलदार, ग्रामपंचायत कर्मचारी रमेश राजळे.सागर बर्डे,एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ बर्डे,राधु माळी, राजेंद्र बर्डे ,रशीद इनामदार, भेया शेख ,नयुम इनामदार ,आदि नागरिक उपस्थित होते .