नेवासा कोर्टातील पाच न्यायधीशांच्या बदल्या. त्यानिमित्त वकील संघाच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
नेवासा न्याय मंदिरातील पाच न्यायमूर्तींचा निरोप समारंभ संपन्न.
न्यायदानाचे पवित्र कार्य अविरतपणे करीत असताना कितीही मानसिक त्रास असला तरीही आपल्या सहकार्यांशी नेहमी सहकार्याची भावना ठेवून न्यायदानाचे कार्य या न्यायमूर्तींनी केले. असे आजच्या या कार्यक्रमानिमित्त प्रत्ययास येत होते.
न्यायदान कक्षेतील सर्व स्टॉप त्याचप्रमाणे ज्येष्ठ व कनिष्ठ वकील या सर्वांनी न्यायमूर्तींनं बद्दल आदराची भावना व्यक्त केली.
तारीख पे तारीख ही फिल्म संकल्पना मोडीत काढण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. अनेक जुनी खटले आम्ही निकाली काढली आहेत त्यासाठी आम्हाला न्यायदान कक्षातील सहकाऱ्यांचे वकिलांचे अतिशय चांगले योगदान मिळाले.
ज्यांच्या आदेशाने एका क्षणात शांतता निर्माण होते. आज त्याच न्यायमूर्तींनी आपल्या कर्मचारी व सहकाऱ्यांची माफी मागावी .कशासाठी तर आमच्याकडून अनावधानाने चुकून तुमचे मन दुखवले असतील असे शब्द वापरण्यात गेले असेल तर आम्हाला क्षमा करा.
काळजाला भिडणारे शब्द आज न्यायमूर्तींच्या मुखातून ऐकण्यास मिळाले. काळजाचा ठाव घेणारे एक एक वाक्य सर्वांना भावनिक करत होते.
ज्ञानाचं माहेर असलेले नेवासा या नेवाशा मध्ये आम्हाला जे शिकण्यास मिळाले ते कदाचित पुढे मिळेल का नाही हे सांगता येत नाही.
फौजदारी गुन्हे सर्वजण हाताळतात परंतु दिवाणी दाव्यातील बारीक गोष्टींचा अभ्यास करून त्यांना न्याय देणे हि खूप महत्त्वाची गोष्ट असते.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एम आय पठाण वकील हे होते , सूत्रसंचालन विजय चंगेडिया यांनी केले .
आभारप्रदर्शन वकील बार संघटनेचे सचिव जमीर शेख यांनी केले .
आज ज्या न्यायमूर्ती यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये जिल्हा न्यायाधीश सिनिअर डिव्हिजन मान्य तापकीरे साहेब. वरिष्ठ न्यायाधीश वरिष्ठ स्तर बी यु चौधरी , एस डी सोनी मॅडम तसेच कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश श्रीमती निवारे मॅडम व कनिष्ठ स्तर. दिवाणी न्यायाधीश ऐ .ऐ पाचार, न्यायाधीश निवारे मॅडम यांचा निरोप समारंभ नेवासा न्यायालया मध्ये नेवासा तालुका वकील संघ यांच्या वतीने संपन्न झाला .
यावेळी अध्यक्ष बन्सी सातपुते. तसेच सचिव जमीर शेख उपाध्यक्ष संदीप सकट महिला वकील उपाध्यक्ष जोशी मॅडम तसेच सर्व नेवासा तालुका वकील संघ यांनी या सर्वांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. आय पठाण वकील तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चंगेडिया व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वकील बारचे सचिव यांनी केले .
कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्वादिष्ट स्नेहभोजनाचा चे आयोजन करण्यात आले होते. न्यायमूर्ती कर्मचारी व वकील संघ या सर्वांनी मिळून या कार्यक्रमाचा व स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.