जिवनातील व्यथा दुर करण्यासाठी शिव महापुराण कथा मार्गदर्शक ठरते. .
प्रतिनिधी घोडेगाव//
जिवनातील व्यथा दुर करण्यासाठी शिव महापुराण कथा .
महंत सुनीलगीरी महाराज.
घोडेगाव (वार्ताहर ) येथील युवा पिढी धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर पाहुन आनंद वाटला. मागील वर्षा पासुन महाशिवरात्रीच्या पर्व कालात येथे शिव महापुराण कथा आयोजीत केली जाते. हा उत्सव चांगला साजरा केला जातो हे कौतुकास्पद आहे. युवा पिढीने श्री घोडेश्वरी देवी मंदिर सह गावातील सर्वच मंदिर जिर्णोद्धार लोकसहभागातून केला. मंदिर व परिसर सुशोभित केल्याने भक्तांची संख्या व पावित्र्य जपले जात असल्याने समाधान व्यक्त केले. धार्मिक कार्यात जनतेने तन मन धन अर्पण करुन चांगले काम उभे करावे. धर्म टिकला तरच समाज टिकेल. जिवनातील व्यथा दुर करण्यासाठी शिव महापुराण कथा आहे . त्याचे श्रवण करा आचरण करा असे महंत सुनीलगीरी महाराज श्रीराम साधना आश्रम यांनी धर्म ध्वज पुजन प्रसंगी म्हटले.
येथील घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे शिव महापुराण कथा आयोजन सप्ताहात धर्म ध्वज पुजन महंत सुनीलगीरी महाराज व साध्वी मुक्ताईनाथ माऊली यांचे हस्ते शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजता करण्यात आले. यावेळी हभप कोरडे महाराज,कांदा आडतदार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक एळवंडे, नेवासा पं स मा उप सभापती दिलीप लोखंडे, मुळा शुगरचे मा संचालक दगडु ईखे, मा सरपंच बाळासाहेब सोनवणे, मा चेअरमन वसंत सोनवणे, सत्यम मित्रमंडळाचे अध्यक्ष पप्पु टेमकर, आदिनाथ दानवे ,भाऊराव जाधव, उदय जाधव,जगन्नाथ आढाव सर, श्रीकांत टेमकर,दामु जाधव,किशोर वाबळे, बापु चेमटे, संभाजी ईखे, शाम कदम,किरण ब-हाटे, राहुल वाघाडे सह असंख्य भक्त गण उपस्थित होते.
सायंकाळी सात वाजता शिव महापुराण कथेला साध्वी मुक्ताईनाथ माऊली यांच्या सुमधुर वाणीने कथेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. आयोजकांनी कथेच्या प्रांगणात श्री शंकर भगवान मुर्ती ,गाय वासरु,श्री शंकर बाबा, अमरनाथ मंदिर गुहा, कथा व्यासपीठ, बैठक व्यवस्था, महा प्रसाद वाटप, पार्किंग, सुरक्षा व्यवस्थेचे चोख नियोजन केल्याने भाविकातुन समाधान व्यक्त होत आहे