संत लोयोला सदन चर्च, श्रीरामपूर आरोग्य दान प्रार्थना संपन्न.

संत लोयोला सदन चर्च, श्रीरामपूर आरोग्य दान प्रार्थना संपन्न.
संत लोयोला सदन चर्च, श्रीरामपूर आरोग्य दान प्रार्थना संपन्न.

श्रीरामपूर  ( प्रतिनिधी ) :- संत लोयोला सदन चर्च, श्रीरामपूर आरोग्य दान प्रार्थना संपन्न. दि. ०२/०३/२०२४ शनिवारी संध्याकाळी ०६:०० ते ९:०० या वेळेत संत लोयोला सदन, श्रीरामपूर येथे, रेव्ह फा संजय ब्राह्मणे, करुणा माता चर्च, वैजापूर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू व करुणा निकेतन विद्यालयाचे प्राचार्य, यांनी या उपवास काळात श्रीरामपूर धर्मग्रामातील भाविकांसाठी आरोग्य दान प्रार्थना व प्रभावी प्रवचन दिले. 

           प्रथमतः रेव्ह फा संजय ब्राह्मणे व संत लोयोला सदन चर्च चे प्रमुख धर्मगुरू रेव्ह फा ज्यो गायकवाड यांनी सर्व भाविकांसाठी संगीतमय मिस्सा बलिदान अर्पण केले.

           रेव्ह फादर संजय ब्राह्मणे प्रमुख याजक म्हणून पवित्र शास्त्रातील सुंदर वचनावर मनाला भावणारे असे प्रवचन केले. एका उधळा पुत्राचा दाखला दिला. 

     "बापापासून भरकटून पश्चाताप पावलेला धाकटा मुलगा बापाला म्हणाला, " बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे . आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. "

     नेहमीच बापाजवळ असलेल्या व नाराज झालेल्या मुलास बापाने म्हटले, " बाळा तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस. आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे. कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे . "

     आपण देखील विपुल अति भौतिक सुविधेमुळे, चैनबाजीमुळे एक प्रकारे पित्यापासून भरकटलेलेच आहोत. दूर गेलेलो  आहोत. त्यामुळेच तर आपण संकटात, अडचणीत सापडलेलो आहोत. ह्या संकटातून ,अडचणीतून आपणास सोडविण्यासाठी आपला पिता सदैव आपली वाट पाहत आहे.

     चला तर आपण आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल , पापा बद्दल त्या दयाघन पित्याकडे क्षमा मागून खऱ्या अर्थाने पापाबद्दल पश्चाताप करु आणि खऱ्या आध्यात्मिक जीवनाचा लाभ घेऊ. कारण आपला पिता, निष्ठूर नसून प्रेमळ व दयाळू आहे. तो केव्हाही आपला स्वीकार करून आपल्या समवेत आनंदोत्सव करण्यास उत्सुक आहे.

     आजच्या या पवित्र शास्त्रातील भरकटलेल्या धाकट्या मुलाप्रमाणे शुद्धीवर येण्यासाठी आणि देवाच्या चांगुलपणाचा आस्वाद घेण्यासाठी आपण विशेष प्रार्थना करू या.  आपण केलेल्या पापांबद्दल पश्चातप करुया  असे रेव्ह फादर संजय म्हणाले. 

     मिसा बलिदान पूर्ण झाल्यावर लागलीस त्यांनी या चर्चमध्ये जमलेल्या श्रीरामपूर शहर, हरेगाव, राहाता, टिळकनगर व आसपासच्या खेड्यातून आलेल्या सर्व भाविकांसाठी या प्रायश्चित्त काळाचे महत्व व उद्देश सांगताना आपल्या हातून झालेल्या चुका, पापे आठवून त्याबाबत पश्चताप करण्याचा कालावधी म्हणजेच हा उपवास काळ होय,  म्हणजेच केवळ दुसऱ्याला दाखवण्यासाठी उपवास करु नये. बायबल मधील वचन सांगताना देव म्हणतो, तुझे हात रक्ताने माखलेले आहेत त्यावेळी मी माझे डोळे मिटून घेतो म्हणजेच देवाविरुद्ध तसेच आपल्या जोडीदाराबरोबर मित्राबरोबर, शेजाऱ्यांशी द्वेष भावना आपल्या मधील पाप देवासमोर कबूल करा पश्च

ताप करा व पाप पुन्हा न करण्याचे देवाला वचन द्या तसा निर्धार करा. दररोजच्या मुख्य प्रार्थने मधील क्षमा यावर बोलतांना रेव्ह फादर संजय म्हणाले सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी आपल्या प्रति अपराध केला आहे त्यांना मनापासून क्षमा करा, कारण जर आपण दुसऱ्यांना क्षमा केली नाही तर आपला देव परमेश्वर आपल्याला क्षमा करणार नाही.        

           दुसऱ्यांना दोष देऊ नका, कुणाच्या उणिवा काढू नका म्हणजेच तुमचेही दोष, उनिवा काढल्या जाणार नाहीत.     

         स्वर्गात जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे परमेश्वराचे वचन पाळा तसेच क्षमा व पश्चाताप, प्रार्थना या मधूनच तो मार्ग स्वर्गात जात असतो. बायबलमधील दाखला देताना एका व्याभिचारी  स्री वरील दोषारोपाचे नायनिवाडा करतांना येशु वरील प्रसंग सांगितला आहे. जमलेल्या जनसमुदाय त्या स्त्रीला दगड धोंडाची शिक्षा न करता एक एक करून निघून जातात येशु त्या स्त्रीला म्हणतो मीही तुला शिक्षा करत नाही जा पुन्हा पाप करू नकोस. 

       नवीन पिढीला संदेश देताना आपले आई-वडील म्हणजेच पालक आपली कशी आतुरतेने वाट पाहत असतात ज्या वेळेला आपण बाहेरगावी शिकायला असतो परंतु सुट्टीच्या वेळेस ज्या वेळेला बाहेरून घराकडे येत असतो त्यांनी आपल्यासाठी किती कष्ट केलेले असतात सर्व पैसा धनदौलत ते आपल्यासाठीच जमा करतात पण जर ऐनवेळी आपण त्यांना टाकून बोललो, इस्टेटि मधून वाटा मागून वडिलांचा पैशातून चैन बाजी केली तर आपल्या आई-वडिलांना फारच दुःख होते सध्याच्या जमान्यात जो लोभ-माया , व्यसनामध्ये व्याभिचारा मध्ये मनुष्य गुरफटलेला आहे. हा केवळ एक आपल्याकडे असलेला मोबाईलचा गैरवापर केल्या मुळे एका क्लिकमुळे आपण मोह जाळ्यात अडकला जातो पापात अडकला जातो यासाठी आई-वडिलांनी आपल्यावर केलेले संस्कार माया काळजी याची आठवण राहू द्या, देवाची आठवण राहू द्या. या काळात क्षमा केलेल्या पापांची आठवण करून त्यांचा पश्चताप करा आपल्याला दिलेल्या बुद्धी तसेच अवयव जसे कान, डोळे,जिभ हे देवाकडून मिळालेले आपल्याला वरदान आहे त्या देवाचा गौरव करा देवाचा गौरव करण्यासाठी त्याचा वापर करा त्याच्याद्वारे पाप करू नका क्षमा व पश्चताप करा ह्या त्यांनी उपदेशात सांगून प्रवचन ऐकण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी विविध आजाराने ग्रस्त असलेल्यांसाठी विशेष प्रार्थना केली. परमेश्वरावर मनापासून विश्वास असणाऱ्या साठी आपल्यातील आजार दूर होतील केवळ हा विश्वासच तुम्हाला बरे करेल येशू म्हणतो मी नितीमान लोकांसाठी नव्हे तर पापी लोकांसाठी आलो आहे.

           पवित्र साक्रामेंतची प्रार्थना होऊन सर्वांना साक्रामेंतचे दर्शन देण्यात आले. प्रवचनातील सर्व भावगीतसा़ठी संगीत  हे रेव्ह. फादर सिंटो खंडाळा, औरंगाबाद धर्मप्रांत यांनी पियानोवर सुमधुर साथ दिली. वैजापूरचे पॅरिशनर यांनी व श्रीरामपूर चर्चचे पॅरिशनर यांनी गीतांसाठी चांगलीच साथ दिली.

            श्रीरामपूर संच लोयोला सदन चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह फा ज्यो यांनी रेव्ह फा संजय ब्राह्मणे व त्यांचे बरोबर रेव्ह फादर सिंटो यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान केला. वैजापूर पॅरिस चे पॅरेशनर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला. 

           रेव्ह फादर संजय ब्राह्मणे यांनी मनोगत व्यक्त करताना रेव्ह फादर ज्यो गायकवाड व सर्व पॅरिशनर यांचे आभार मानले, या उपवास काळात मला आपण प्रवचन देण्याची व मला ही प्रार्थना करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि सर्वांनी देवाची प्रार्थना, इतरांना क्षमा, आपल्या पापांचा पश्चताप करावे असे सांगितले.