खंडणीसह, खून व मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार विश्वजीत कदम स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरबंद .

Delhi91 News ची खास रिपोर्ट
खंडणीसह, खुन व मोक्काचे गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार विश्वजीत रमेश कासार जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिकत अशी की, आरोपी विश्वजीत रमेश कासार रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर याचेविरुध्द नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 1123/2020 भादवि कलम 302, 326, 324, 323, 504, 506, 365, 143, 147, 148, 149, 120 (ब), 212 महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा कलम (मोक्का) 3 (1) (i), 3 (2), 3 (4) अन्वये दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने मा उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद न्यायालयातुन औषधोपचाराकामी 03 महिण्याकरीता जामीन मिळविलेला होता. जामीनाची मुदत संपण्यापुर्वी त्याने मा. सर्वोच्य न्यायालय दिल्ली येथे मुदत वाढीकरीता अपील दाखल केलेले होते. त्यावर मा. सर्वोच्य न्यायालय दिल्ली यांनी त्यास 02 आठवड्याची मुदतवाढ देवुन त्यानंतर मा. विशेष न्यायाधीश मोक्का न्यायालय अहमदनगर येथे हजर होणेबाबत आदेश दिलेले होते. परंतु त्याने मा. सर्वोच्य न्यायालयाचे आदेशाचा अवमान करुन दोन आठवड्याची मुदत संपल्यानंतर देखील तो हजर न होता फरार झालेला होता.
त्या दरम्यान फिर्यादी अनुराज नाथा लोखंडे वय 22, रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर यांची चुलती नामे शोभा लोखंडे ह्या घरासमोर असतांना आरोपी विश्वजीत रमेश कासार याचे सांगणेवरुन त्याचे साथीदार यांनी फिर्यादीचे घरासमोर जावुन दादागिरी करुन 2,70,000/- रुपये खंडणीची मागणी करुन खंडणी दिली नाही म्हणुन नाथा ठकाराम लोखंडे रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर यांना जबर मारहाण करुन त्यांचा खुन केला होता. सदर घटनेबाबत नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 376/2023 भादवि कलम 302, 120 (ब), 384, 386, 387, 323, 504, 506, 507, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती सदर गुन्ह्यास भादवि कलम 75 व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा कलम (मोक्का) 3 (1) (i), 3 (2), 3 (4) अन्वये वाढीव कलमांचा अंर्तभाव करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये विश्वजीत रमेश कासार हा फरार होता.
नमुद आरोपी याने यापुर्वी कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 391/2015 भादवि कलम 394, 397 सह आर्म ऍ़क्ट कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा केल्याने त्याचेविरुध्द तपासाअंती मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्यामध्ये मा. जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांनी आरोपीस 10 वर्षे कारावास व 15 हजार रुपये दंड अशी शिक्षा शिक्षा सुनावलेली होती. सदर आरोपीने शिक्षेविरोधात अपील दाखल करुन जामीन मिळविलेला होता व जामीनावर असतांना त्याने 14 गुन्हे केलेले आहेत.
राकेश ओला , पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि/ दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सदर आरोपीचा शोध घेवुन ताब्यात घेणेबाबत आदेश दिलेले होते. नमुद आदेशान्वये पोनि/ दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, पोहेकॉ/रविंद्र पांडे, सुरेश माळी, पोना/रविंद्र कर्डिले, विजय ठोंबरे, फुरकान शेख, संतोष खैरे, पोकॉ/सागर ससाणे, पोकॉ/रोहित येमुल, पोकॉ/अमोल कोतकर, पोकॉ/अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड अशा पोलीस अंमलदार यांचे विशेष पोलीस पथक स्थापन करुन आरोपी विश्वजीत रमेश कासार याचा शोध घेणेबाबत सुचना देवुन पथक रवाना केले होते. नमुद सुचना प्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार असे आरोपीचा शोध घेत असतांना पोनि श्री दिनेश आहेर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदर आरोपी हा पुणे परिसरामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पथकास तात्काळ पुणे या ठिकाणी रवाना केले होते. पथक पुणे या ठिकाणी जावुन रावेत परिसरात सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम येताना दिसला पथकाची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्याचे नांव गांव विचारता त्याने पोलीस पथकास त्याचे खोटे नांव सांगितले. परंतु ताब्यात घेण्यात आलेला इसम हाच विश्वजीत रमेश कासार असल्याचे पोलीस पथकास खात्रीशिर माहिती असल्याने पोलीस पथकाने त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने त्याचे खरे नांव विश्वजीत रमेश कासार वय 31 वर्षे, रा. वाळकी ता. जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. सदर आरोपीस नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 1123/2020 व नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 376/2023 या गुन्ह्याचे तपासकामी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे समक्ष हजर केले आहे. पुढील कारवाई मा. उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग हे करीत आहे.
आरोपी विश्वजीत रमेश कासार हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व पुणे जिल्ह्यामध्ये मोक्का, खुन, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, विनयभंग, आत्महत्येस प्रवृत्त करणे, अपहरण, फसवणुक, असे गंभीर स्वरुपाचे एकुण - 25 गुन्हे दाखल आहेत .
सदरची कारवाई राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे , अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.