कौठा लोकनियुक्त सरपंच प्रमोद गजभार यांनी २ हनुमान मंदिरास झुंबराची श्रावणी भेट.
*लोकनियुक्त सरपंच प्रमोद गजभार यांनी २ हनुमान मंदिरास झुंबराची श्रावणी भेट.*
नेवासा (प्रतिनिधी युनुस पठाण):- नेवासा तालुक्यातील कौठा येथील श्रावण शनिवार या शुभमुहूर्तावर गावचे लोक नियुक्त सरपंच तथा लोकसेवा सरपंच संघटनेचे नेवासा तालुका उपाध्यक्ष प्रमोद गजभार यांनी द्वारकापूर हनुमान मंदिर व गावठाण हनुमान मंदिर येथे सुशोभित इलेक्ट्रॉनिक झुंबर बसवून दोन मंदिरास श्रावणी भेट दिली.

सरपंच हे विविध धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असतात गावच्या विकासात त्यांचा मोठा हातखंड आहे चांगल्या कामाची हातोटी म्हणून त्यांना काही दिवसापूर्वी तीन विविध संस्थेचे आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे तालुका भर चर्चा असून त्यांचे अभिनंदन होत आहे.
गावठाण हनुमान मंदिर व द्वारकापूर हनुमान मंदिर या दोन मंदिरांना झुंबर भेट दिल्याबद्दल कौठा ग्रामस्थांच्या वतीने व देवस्थान वतीने सन्मान करत त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.








