राहुरी पोलिसांची मोठी कारवाई: अपहृत 17 वर्षीय मुलगी सुखरूप, ऑपरेशन मुस्कानअंतर्गत 109 मुलींचा शोध , सुटका
*राहुरी पोलिसांची मोठी कारवाई: अपहृत 17 वर्षीय मुलगी सुखरूप, ऑपरेशन मुस्कानअंतर्गत 109 मुलींचा शोध , सुटका

*राहुरी, दि. 13 मे 2026*: राहुरी पोलिसांनी दि. 30 एप्रिल रोजी घरातून बेपत्ता झालेल्या 16 वर्ष 7 महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिची सुखरूप सुटका केली.
मुलगी दि. 30/04/2026 रोजी सायंकाळी 8:30 वाजता घरातून निघून गेली होती. पालकांच्या तक्रारीवरून राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 448/2026 BNS 137(2), 87 अंतर्गत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल होता.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी सचिन दिलीप शिंदे, वय 28 याला दि. 11/05/2026 रोजी रात्री 11:47 वाजता अटक करण्यात आली. त्याने मित्राच्या मदतीने लग्नासाठी मुलीला पळवून नेल्याची कबुली दिली. मुलगी आश्वी पोलीस हद्दीत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने दि. 13/05/2026 रोजी तिचा शोध घेऊन तिला पालकांच्या ताब्यात दिले.
ही कारवाई ऑपरेशन मुस्कान अभियाना अंतर्गत झाली असून, या मोहिमेत राहुरी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 109 मुलींचा शोध घेऊन त्या पालकांच्या ताब्यात दिल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोहेकॉ राजु पुंड, रामनाथ सानप, पोकॉ गणेश मैड, सचिन धनाड, दरेकर, पो ना वेताळ यांनी केली.
✅ _राहुरी ब्रेकिंग_ ✅
_अपहृत अल्पवयीन मुलगी सुखरूप सापडली_
ऑपरेशन मुस्कानअंतर्गत राहुरी पोलिसांची कारवाई.
आरोपी अटकेत, 109 मुलींचा आतापर्यंत शोध








