महात्मा फुले कृषी विद्यापीठ ग्रंथालयात डॉ. एस . आर. रंगनाथन जयंती व राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा .

महात्मा फुले कृषी विद्यापीठ ग्रंथालयात डॉ. एस . आर. रंगनाथन जयंती व राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा .

*महात्मा फुले कृषी विद्यापीठ ग्रंथालयात डॉ. एस.आर. रंगनाथन जयंती व राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा*

*डॉ. एस.आर. रंगनाथन यांचे तत्वज्ञान व कार्य जगभरातील ग्रंथालयाच्या अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक*

*- प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे*

           तमिळनाडूतील शियाली येथे 9 ऑगस्ट 1892 रोजी जन्मलेले डॉ. शियाली रामामृत रंगनाथन हे भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. सुरुवातीला गणिताचे प्राध्यापक असलेले रंगनाथन 1924 साली मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून कार्यरत झाले आणि ग्रंथालय विज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले. त्यांचे तत्त्वज्ञान व कार्य आजही जगभरातील ग्रंथालय विज्ञानाच्या अभ्यासक्रमात मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ.सचिन नलावडे यांनी केले.

             महात्मा फुले कृषी विद्यापीठतील विद्यापीठ ग्रंथालयात ग्रंथालय विज्ञानाचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करतांना डॉ सचिन नलावडे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे ग्रंथपाल तथा संख्या शास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. आर. पाटील उपस्थित होते. याप्रसंगी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. सचिन सदाफळ उपस्थित होते. 

              यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. एम. आर. पाटील म्हणाले कि डॉ. एस.आर. रंगनाथन यांनी जगप्रसिद्ध ग्रंथालय शास्त्राचे पाच नियम मांडले तसेच कोलन वर्गीकरण पद्धती विकसित केली. त्यांनी ग्रंथालयावर अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन 1957 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर करून आपले ज्ञानवर्धन करण्याचे आणि वाचनाची सवय जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी ग्रंथालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.