*अहिल्यानगर मनमाड रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले रस्ता प्रशासन नागरीकांच्या जिवानिशी करतय खेळ*

*अहिल्यानगर मनमाड रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले रस्ता प्रशासन नागरीकांच्या जिवानिशी करतय खेळ*

राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरात आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास दोन ठिकाणी अपघात झाले. डिग्रस फाटा परिसरात झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला तर शिंगणापूर फाटा परिसरात झालेल्या अपघातात शशिकांत दुधाडे हे जागीच ठार झाल्याची घटना समोर आली.

        शशिकांत तुकाराम दुधाडे, वय ६५ वर्षे, रा. मुंजोबा नगर, राहुरी हे आज दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजे दरम्यान त्यांच्या नातवाला शाळेत सोडण्यासाठी मोटरसायकलवर विद्यापीठ येथे गेले होते. नातवाला शाळेत सोडल्यानंतर शशिकांत दुधाडे हे मोटर सायकलवर विद्यापीठ कडून राहुरीकडे येत असताना नगर मनमाड महामार्गावर धरमाडी गेस्ट हाऊस जवळ त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या घटनेत शशिकांत दुधाडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले.

त्यांना तातडीने राहुरी येथील एका खाजगी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या दरम्यान राहुरी खुर्द येथील कृष्णा सोमनाथ गोल्हार, वय २२ वर्षे, हा तरुण तो अपघात पाहण्यासाठी त्याच्या मोटारसायकलवर जात असताना शनी शिंगणापूर फाटा परिसरात त्याच्या मोटारसायकल ला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या घटनेत कृष्णा गोल्हार हा गंभीर जखमी झाला असून त्याला अहिल्यानगरीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

        शशिकांत दुधाडे यांच्या अपघाताची माहिती समजतात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली तसेच प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी कारखान्याचे संचालक हर्षद तनपुरे, आर आर तनपुरे, नंदूभाऊ तनपुरे, गजानन सातभाई, राजेंद्र बोरकर, राजेंद्र दुधाडे, किशोर दुधाडे, पप्पू कोरडे, कांता तनपुरे, संतोष आघाव, पांडूभाऊ उदावंत आदीसह शेकडो नागरिकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.

             मयत शशिकांत दुधाडे हे शहरातील डाॅ. सुहास दुधाडे व संकेत दुधाडे यांचे वडील होत. त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र नगर मनमाड महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली असून मृतांची देखील संख्या वाढली. गेल्या पंधरा दिवसात राहुरी तालुका हद्दीत विविध ठिकाणी अपघात होऊन सात जणांचा मृत्यू झालाय. यामुळे तालुक्यातील नागरिक संतप्त झाले आहेत.

नगर मनमाड रस्ता ठेकेदाराच्या मनमानी कारभाराने वेळोवेळी नादुस्त होत आहे चढया दराने निविदा भरणे तसेच रोडचे काम सुरू असतांना त्यावर कुणीही अभियंता नसल्याचा फायदा घेवून काळे ऑईल सारखा पदार्थांचे मिश्रण करून डांबरा ऐवजी काळे ऑईल मिस्त्रीत बोगस रस्ता करणे यागोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे भ्रष्टाचारात मोठया प्रमाणात वाढ झाल्याने सदरच्या दुर्घटणेच्या घटणा घडत आहे यावर सरकारणे गप्प बसुन बघ्याची भूमीका न घेता ठोस कार्यवाही करावी,