आर जे दरंदले सर यांचा न्यू इंग्लिश स्कूल शिरेगाव खेडले परमानंद या ठिकाणी सेवा स्फूर्ती सोहळा संपन्न.

आर जे दरंदले सर यांचा न्यू इंग्लिश स्कूल शिरेगाव खेडले परमानंद या ठिकाणी सेवा स्फूर्ती सोहळा संपन्न.

प्रतिनिधी :-संभाजी शिंदे ,खेडले परमानंद नेवासा

शिक्षक म्हटलं की जीवनातील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व.

       असेच एक व्यक्तिमत्व जे दोन पिढ्या अगदी वडिलांपासून ते मुलांना शिकवण्यापर्यंतचे कार्य करणारे आर जे दरंदले म्हणजेच रामभाऊ दरंदले

        त्यांनी त्यांच्या सेवेचा सर्वात मोठा कालावधी न्यू इंग्लिश स्कूल शिरेगाव - खेडले परमानंद या ठिकाणी व्यतीत केला. अगदी दोन्ही गावातील लहानांपासून ते थोरां पर्यंत सर्वजण  घरच्यांसारखे यांच्याशी संपर्कात होते.

         आजी माजी विद्यार्थी त्यांचे शालेय जीवनातील स्थान  कधीही विसरू शकणार नाही

        न्यू इंग्लिश स्कूल शिरेगाव या ठिकाणी आर जे दरंदले सर यांचा सेवा स्फूर्ती समारंभ पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व दोन्हीही गावातील अनेक मान्यवर  त्याचप्रमाणे अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित होते

        मुख्याध्यापक सोनवणे सर व न्यू इंग्लिश स्कूल यांच्या वतीने हा सेवा स्फूर्ती सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी जाधव एस बी सर यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावना केली, मुळा एज्युकेशन सोसायटीचे शाळा समिती सदस्य डॉक्टर रमेश जाधव, दादासाहेब होन, दगू बाबा हवालदार न्यू इंग्लिश स्कूल शिरेगाव- खेडले परमानंद स्कूल कमिटी अध्यक्ष नयुम इनामदार, शिवाजी जाधव, चंद्रकांत जाधव, लक्ष्मण जाधव फयुम इनामदार, प्रशांत केदारी, खेडले परमानंद चे माजी सरपंच सलीम इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूलचे आर .जे दरंदले सर यांचे सहशिक्षक जंगले सर यांच्यावतीने  स्नेह भोजनाचे नियोजन केले. आर जे दरंदले सर यांनी शाळेसाठी अकरा हजार रुपयाची देणगी विकास निधी म्हणून दिली

      प्रथम कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. आर.जे सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्यांचा सपत्नीक सहकुटुंब सहपरिवार सत्कार करण्यात आला. लांघ सर यांनी सेवा स्फूर्ती सोहळ्याचे आभार प्रदर्शन केले

     दोन्ही गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना ओळखणारे व्यक्तिमत्व म्हणजे आर जे दरंदले सर

          कुणीही द्वेष करणार नाही असे व्यक्तिमत्व सर्वजण त्यांच्याशी अगदी प्रेमाने व आपुलकीने आपलेपणाने राहायचे. सरांचा सेवा स्फूर्ती समारंभ होता परंतु सर्वांना त्यांच्या सेवा स्फूर्तीमुळे हळहळही वाटत होती. सर आपल्याला आता जसे रोज भेटायचे तसे वर्षानुवर्ष भेटतील की नाही हे  प्रत्येकाच्या मनात जाणवत होते........