आंतरविद्यापीठ अविष्कार संशोधन स्पर्धेत कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील कु . श्रावणी बाबासाहेब शिंदे प्रथम क्रमांकाने विजयी

आंतरविद्यापीठ अविष्कार संशोधन स्पर्धेत कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील कु . श्रावणी बाबासाहेब शिंदे प्रथम क्रमांकाने विजयी

              महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी अंतर्गत श्री . शरद कृषी महाविद्यालय जैनापूर ता.शिरोळ जि.कोल्हापूरची विद्यार्थीनी कु.श्रावणी बाबासाहेब शिंदे,चतुर्थ वर्ष (कृषी) हिस राज्यस्तरीय आंतरविद्यापिठ अविष्कार संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे . नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठात पार पडलेलेल्या स्पर्धेत या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक मिळविला आहे .

 

              कु.श्रावणी शिंदे हीस जैनापूरचे कृषी अभियांत्रिकीचे प्राध्यापक संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून कृषी व पशूसंवर्धन प्रवर्गातून हे पारितोषिक मिळाले आहे.याबद्दल तिचे म . फु . कृ .विद्यापीठ राहुरीचे सन्माननीय कुलगुरू डाॅ . प्रशांतकुमार पाटील ,अधिष्ठाता डाॅ.श्रीमंत रणपिसे,संचालक रा.से.योजना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डाॅ .महावीरसिंग चौहान ,क्रिडाधिकारी डाॅ .विलास आवारी ,कुलसचिव डाॅ.विठ्ठल शिर्के व राजभवनचे अविष्कार प्रमुख डाॅ .अतुल अत्रे यांनी कु.श्रावणी शिंदेचे अभिनंदन केले आहे . कु .श्रावणी शिंदेच्या या यशासाठी डाॅ.मुकूंद गुंड व डाॅ.प्रविण कदम यांनी मार्गदर्शन करून परिश्रम घेतले .