*नगर -मनमाड राष्ट्रीय महामार्ग हा सध्या बनला मृत्युचा महामार्ग यावर आज पुन्हा एकाचा बळी.*

*नगर -मनमाड राष्ट्रीय महामार्ग हा सध्या बनला मृत्युचा महामार्ग यावर आज पुन्हा एकाचा बळी.*

दि.०२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजेदरम्यान विद्यापीठ डेरी फाटा ते वळू प्रकल्प मध्यभागी नगर - मनमाड राष्ट्रीय महामार्गावर ज्ञानदेव पाटीलबा बलमे वय वर्ष ३१ रा.वडनेर ता.राहुरी जि.अहिल्यानगर हे एम आय डि सी येथील कंपनीमध्ये दररोजच्या प्रमाणे आपल्या मोटरसायकल क्र. MH -17 DK 19 31 - कामावर जात असता

रस्स्त्यावरील खडया मध्ये आदळून नगरकडेच जाणाऱ्या कंटेर क्र. RJ 14 GK 8730 खाली जाऊन जागेवरच मृत्यु झाला घटणेची माहिती मिळताच पोलिस हवालदार गणेश सानप वत्यांचे सहकारी पोलिस येथील सुरक्षा अधिकारी श्री गोरक्षनाथ शेटे यांनी त्यांचे सुरक्षा पर्यवेक्षक आमोल दिवे,दत्ता आडसूरे ,सोनु दौन्ड,आकुश दळवी,हे त्वरित दाखल होऊन संबंधीत कंटेनर खाली सापडलेल्या मृतदेहाला उचलुन अँबुलन्स मध्ये टाकले

नगर-मनमाड रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असुन अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागत आहे

याकडे आजपर्यंत मोठ्या प्रमाणात पेपरबाजी सोशल मिडिया न्युजपोर्टल द्वारे बातम्या प्रसारीत करण्यात आल्या परंतू रोडचे काम करणारे ठेकेदार इंजिनियर -अधिकारी यांचेवर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही मा. जिल्हा अधिकारी अहिल्यानगर यांनी जिल्ह्यतील रोडवर पडलेल्या खड्यांकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी.