महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात आंतर शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धा सुरू.

महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात आंतर शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धा सुरू.

शिरेगाव खेडले – महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात हिवाळी क्रीडा स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात

 

महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, शिरेगाव खेडले येथे वार्षिक हिवाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात झाले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडासंस्कार, शारीरिक तंदुरुस्ती आणि टीमस्पिरिट वाढविण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निरंजन पाटील तुवर (सरपंच, शिरेगाव), जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी तात्या जाधव, मोहम्मद इनामदार आणि पत्रकार संभाजी शिंदे यांनी उपस्थिती लावून स्पर्धेचे उद्घाटन केले.

 

या प्रसंगी मुख्याध्यापक लहानु ढाले सर, जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी तात्या जाधव व पत्रकार संभाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणे केली. क्रीडा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष जाधव सर यांनी प्रभावीपणे केले. तर आभार प्रदर्शन मोटे सुरेश सर यांनी करून उपस्थित मान्यवरांचे, शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

कबड्डी, खो-खो, धावणे, लांब उडी आदी विविध स्पर्धांमुळे विद्यालय परिसर क्रीडाउत्साहाने गजबजून गेला होता. स्पर्धा पुढील दोन दिवस सुरू राहणार असून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता पाहायला मिळत आहे.