नेवासा- खेडले परमानंद मार्गे -सोनई बस सेवा तातडीने सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी..

नेवासा- खेडले परमानंद मार्गे -सोनई बस सेवा तातडीने सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी..

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी//

      खेडले परमानंद , शिरेगाव ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थी व शेतकऱ्यांची वाहतुकीची नियमित होत असलेली गैरसोय लक्षात घेता .नेवासा पानेगाव शिरेगाव-खेडले परमानंद- मार्गे सोनई बस सेवा सुरू करण्यासंबंधी

चे निवेदन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नेवासा आगार प्रमुख प्रशांत होले यांना देण्यात आले .

       अनेक वर्षांपासून वाहतुकीच्या गैरसूवीमुळे अनेक विद्यार्थिनींचे शिक्षण अधुरे राहिले आहे .बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यामुळे विद्यार्थ्यावर होणारे हल्ले लक्षात घेता सायकलवर विद्यार्थ्यांना जाणं आता जीवावर खेळण्या गत झालेला आहे .हा मोठा जिकरीचा प्रश्न आहे.

         जवळच असलेल्या सोनई या ठिकाणी

शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनीची मोठी गैरसोय होते . महिला,वृद्ध ,आजारी व्यक्ती यांची देखील मोठी गैरसोय होते.

          ही बाब लक्षात घेऊन तातडीने बस सेवा सुरू करावी अशी मागणी शिरेगाव व खेडले परमानंद ग्रामस्थांच्या वतीने शिरेगावचे माजी सरपंच किरण जाधव व खेडले परमानंद येथील समाजसेवक संभाजी शिंदे यांच्या वतीने निवेद देण्यात आले .प्रसंगी दोन्ही गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

       यावेळी आगार प्रमुख प्रशांत होले यांनी सांगितले की लवकरच संबंधित बाबीचा विचार करून तातडीने बस सेवा सुरू करण्यात येईल.