नगर -दौंड रोडवर दोन गाड्यांचा भीषण अपघात. .!!! अपघातग्रस्त रुग्णांची परिस्थीती स्थिर..!!

नगर -दौंड रोडवर दोन गाड्यांचा भीषण अपघात. .!!! अपघातग्रस्त रुग्णांची परिस्थीती स्थिर..!!

श्रीगोंदा:-- नगर-दौंड रोडवर चिखली घाटात ,पोलीस चौकी आहे त्या ठिकाणी दिनांक 5 मे 2022 रोजी दुपारी 4:30 च्या सुमारास तवेरा गाडी क्रमांक  MH-19 BJ- 5484 तसेच हुंदाई एओन गाडी क्रमांक MH-19 CF - 3864 या दोन वाहनांचा अपघात झाला .तवेरा  गाडीतील प्रवाशी जेजुरी येथुन दर्शन करुन त्यांच्या गावी जळगाव येथे जात होते. परंतु, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडीचे स्टेरिंग जोरात फिरल्या मुळे गाडी देखील  जागेवर जोरात फिरुन डिव्ह्यायडर ओलांडून नगरकडून  येणाऱ्या हुन्दाइ एओन गाडीवर जोरात आदळली. या गाडीचे मालक संदिप पाटील सर हे शिक्षक आहेत. ते गाडी चालवत होते. त्यांच्या गाडीमध्ये पत्नी, मुलगा, मुलगी व आई-वडील होते. घटनेनंतर सर्वांना नगर येथील वीर हॉस्पीटल येथे भर्ती करण्यात आले.तवेरा गाडीतील जखमींना सुध्दा नगरला खाजगी वाहनाने हलविण्यात आले. अनेक नागरिकांनी शासनाच्या असणाऱ्या 108 या रुग्णवाहीकेला फोन करुन मदत मागितली परंतु वेळेत कुठल्याच प्रकारची मदत मिळाली नसल्याचे घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींने सांगितले. शासनाच्या 108 या रुग्णवाहिके मुळे अनेक अपघात ग्रस्तांना वेळेत आणि तातडीची मदत मिळत नसल्याकारणाने अनेकांना आपले जीव गमवावे लागत असल्याचे माहिती मिळत आहे. यामुळे अपघात ग्रस्तांना रोडने जाणाऱ्या खाजगी वाहानाना  थांबवून अपघात ग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .यावेळी वाहान असणाऱ्या नागरिकांनी देखील सहकार्य दाखवले.कोळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.हेमंत नलगे यांना दक्ष फौंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप यांनी विनंती करताच त्यांनी होकार दर्शवला. समयसुचकता दाखवत हेमंत नलगे व त्यांचे चिरंजीव डॉ.ऋषीकेश नलगे यांनी तात्काळ मदत दिली.तसेच त्या ठिकाणी अपघात कोणाचा झाला हे बघण्या करिता इनोव्हा गाडीतून आलेले श्रीशेठ यांनीही अपघातग्रस्थांना नगरला नेण्यास तात्काळ  सहकार्य केले. श्रीरामपुर येथील रहिवाशी असणारे मेजर अन्वर व त्यांच्या पत्नीने तर दत्ताजी जगताप यांचे सोबत असणाऱ्या अपघातग्रस्तांना गाडीतुन बाहेर काढण्यास मदत केली.संध्याकाळी उशिरा पर्यंत सर्व अपघातग्रस्तांची प्रकृती स्थिर  असल्याचे डॉक्टरांनी आपल्या भ्रमणध्वनी वरून मदत करणाऱ्या व्यक्तींना सांगितले. .