पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार : -सौ .हर्षदाताई काकडे .

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार : -सौ .हर्षदाताई काकडे .

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार:- सौ. हर्षदाताई काकडे* 

   आव्हाणे बु :- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये २८ वर्ष हिंदवी स्वराज्याचे समर्थपणे रक्षण केले. त्यांनी आदर्श राज्यकारभार केला. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले .शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी व्यापार ,उद्योगाला चालना दिली. शेतकऱ्यांना विहिरी खोदून दिल्या. तळी निर्माण केली. घाट, रस्ते, मंदिरे बांधले. मोफत पाणपोई ,धर्मशाळा बांधल्या .त्यांचा हा महान कार्याचा वारसा जोमाने पुढे नेणार असल्याचे प्रतिपादन जि.प. सदस्या तथा महिला व बालकल्याण समिती अहमदनगर च्या माजी सभापती सौ. हर्षदाताई विद्याधर काकडे यांनी केले.सौ काकडे यांना २०१५-२०१६या वर्षाचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब ,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व महिला बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोंढा साहेब यांच्या शुभहस्ते मुंबईत (८ मार्च )जागतिक महिला दिनानिमित्त प्रदान करण्यात आला .त्याबद्दल त्यांचा हासनापूर येथील ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला ;त्यावेळी त्या बोलत होत्या .पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी आणखीन वाढली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला त्या जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करावे अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना पुरस्कार स्वीकारते वेळी केली. यावेळी जेष्ठ नेते श्री शिवाजीराव काकडे साहेब व सौ. हर्षदाताई काकडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. आज झालेल्या सत्कारसमारंभ प्रसंगी युवा आघाडी चे अध्यक्ष लक्ष्मणराव पातकळ प्रा.सखाराम घावटे सर हसनापूर गावचे.सरपंच सौ. शोभा नवनाथ ढाकणे , अशोक शिरसाठ ,ग्रा.प सदस्य काकासाहेब ढाकणे ,उत्तम ढाकणे सर. विश्वास ढाकणे. नवनाथ ढाकणे. शेषराव ढाकणे. दिनकर ढाकणे. सूर्यभान धायगुडे. नामदेव विघ्ने. रामराव ढाकणे. रावसाहेब बडे. रावसाहेब ढाकणे. द्वारका ढाकणे. अरुणा विघ्ने. भगवान ढाकणे. मीना ढाकणे. सुभद्रा ढाकणे. लीलाताई ढाकणे. काकासाहेब धायगुडे. अर्जुन खंडागळे. भगवान ढाकणे (सोसायटी चेअरमन) मारुती ढाकणे. इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते सौ. काकडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.