भाविकांची साडेसाती घालवणाऱ्या शनि महाराजांच्या शनिशिंगणापूर रस्त्याला लागली प्रशासनाची साडेसाती.

भाविकांची साडेसाती घालवणाऱ्या शनि महाराजांच्या शनिशिंगणापूर रस्त्याला लागली प्रशासनाची साडेसाती.

दिल्ली 91 न्यूज वृत्तांत//शनिशिंगणापूर

        शनिशिंगणापूर ते संभाजीनगर अहमदनगर हायवे ला जोडणाऱ्या रस्त्याची कमरा इतके मोठमोठे खड्डे पडले आहे .त्यामुळे शनी भक्तांना व नागरिकांना असा प्रश्न पडला आहे की जणू या रस्त्याला प्रशासनाची साडेसाती लागलेली आहे कि काय ?

        

           मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे .मग नाईलाजाने अखेर शनिशिंगणापूर ग्रामपंचायतीने स्वखर्चातून हे खड्डे बुजवले आहेत.

     

         याबाबत पत्रकारांशी चर्चा करताना नेवासा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष एडवोकेट पंकज जाधव यांनी ठाम भूमिका घेऊन याबाबत लवकरच एक जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

  आंतरराष्ट्रीय देवस्थानला जोडणाऱ्या संबंधित रस्त्याबाबत प्रसारमाध्यमांनी माहिती प्रसिद्ध करून सुद्धा संबंधित विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे .

     

        राहुरी- शिंगणापूर ते हायवे पर्यंत जरी केंद्रीय तीर्थक्षेत्र विकास निधीतून रस्त्याचे काम सुरू असले तरी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये शनिशिंगणापूर ते संभाजीनगर हायवे पर्यंत रस्त्याचे काम अगदी शंभर टक्के अपूर्ण अवस्थेत असून न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी या रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक होते .असे असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

         

       रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी का डावलण्यात आली ? असा सवाल एडवोकेट जाधव यांनी केला आहे .या रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक अपघात झालेले आहेत.त्यामुळे भाविकांसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळाच बनलेला आहे .भाविकांना येथील रस्त्याचा अंदाज नसल्याने चार चाकी वाहनांचे नुकसान होते ,जीवित हानी होते याला जबाबदार कोण ? रस्ता दुरुस्त करण्याची मागणी सातत्याने संबंधित विभागाकडे केली असता त्यांच्या कार्यालयाचा दूरध्वनी कोणीही उचलत नाही कधीतरी उचलला तर साहेब साइटवर गेले आहेत असे मोघम उत्तर दिले जाते .

    

         तालुक्यातील रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाली असताना साहेब नेमक्या कोणत्या साईट पाहतात ? 

 

             शनिशिंगणापूरला राज्य व राज्याच्या बाहेरून भाविक येत असतात तरीसुद्धा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्त करणे शक्य होत नाही का ?असा सवाल जाधव यांनी केलाय.

  

जाड कातडीच्या अधिकाऱ्यांना कधी जाग येणार?

 

        उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार का या गोष्टीकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे?

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता यामुळे या रस्त्याच्या दयनिय अवस्थेमुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.