*अक्षय तृतीया सणाला होत असलेले "बालविवाह" रोखा*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
सोलापूर. दि.29-04 अक्षय तृतीया हा सण भारतामध्ये काही
ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साहात आयोजित करण्यात येत
असतो. या सणांमध्ये काही भागात बालविवाह हा मोठ्या
प्रमाणात होण्याची शक्यता असते. अक्षय तृतीया हा सण 3 मे
रोजी आहे. जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत याबाबत
संबंधितांनी बालविवाह रोखण्यास मदत करावी असे निर्देश
सोलापूर जिल्हा अधिकारी श्री मिलिंद शंभरकर यांनी केले.
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात लागू
करण्यात आलेला आहे. बालविवाह आयोजित करणे हा
अजामीनपात्र गुन्हा आहे.
बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार प्रत्येक गावातील
ग्रामसेवकांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित
केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाह होऊ नये यासाठी
गावातील ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी सेविका, बाल कल्याण
समिती, बाल संरक्षण कक्ष व पोलीस विभाग यांनी आवश्यक त्या
उपाय योजना कराव्यात असे केल्यामुळे जिल्ह्यामध्ये बालविवाह
होणार नाहीत असे जिल्हाधिकारी श्री शंभरकर म्हणाले.
त्याबाबत संबंधितांनी ग्रामसेवक सरपंच, पोलीस विभाग किंवा
चाइल्ड लाइन 1098 या हेल्पलाइन क्रमांकावर ला संपर्क
साधावा. याची पूर्णपणे माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त रित्या
ठेवण्यात येईल असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ.
विजय खोमणे यांनी दिली.