डिग्रस येथिल जमीन हडप प्रकणातील मुख्य आरोपी मोकाट, सदर प्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार दाखल . .
सदध्या तालुका राहुरी येथील महाराष्ट्र व बाहेर राज्यात गाजत असलेले बनावट वारस लावून जमिन हडपली प्रकरण भारत देशातील अनेक राज्यांमध्ये गाजत आहे.
तक्रारदार - नाना तुकाराम पवार यांनी प्रथम तक्रार अर्ज दि.२८/१२/२०२२ रोजी पोलिस अधिक्षक अहमदनगर यांचेकडे सादर केला होता.
त्यावर पोलिस अधिक्षकांची काहीच कारवाही दिसत नसल्याने दि.२१/०४/२०२३ रोजी अमरण उपोषण करणे बाबत स्मरणपत्र सादर केले असता.
त्यानंतर हि तो अर्ज या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करणे साठी मा.उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांचेकडे व पोलिस भापोसे उपअधिक्षक मॅडम यांचे परवानगी साठी सर्व चौकशी कागद पत्रे तयार असताना तब्बल ७ महिने या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करणे साठी इतका वेळ लागला परंतु
या प्रकरण्पतील एक प्रमुख मोरख्या आरोपी नामे रंभाजी बाबूराव गावडे. याचे नाव असून सदर पोलिस अधिकार्याने या फीर्यादी मध्ये तक्रार घेणार्या कर्मचार्यास त्याचे नाव घालण्यास मनाई केली.
रंभाजी बाबूराव गावडे हा वारंवार त्या तपस्या अधिकारी निरज बोकील यांचे संपर्कात असल्यामुळे तपासी अधिकारी बोकील यांनी जानुन बुजुन
नमुद आरोपीचे नाव फीर्यादीत घेतले नाही व सदर आरोपीस पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे.
म्हणून सदर एफ आय आर नंबर 0 719
या फीर्यादीचा तपास निरज बोकील यांचेकडून काढून घेवून दुसऱ्या पोलिस अधिकार्याकडे सोपवावा तसेच या प्रकरणातील आरोपी हे राजरोस मोकाट न्यायालय परिसरात व पोलिस स्टेशन मध्ये फिरताना दिसत आहेत
यामुळे फीर्यादी व त्यांच्या घरातील व्यक्तींच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
असा तक्रार अर्ज आज रोजी फीर्यादीने S.P.अहमदनगर राकेशजी ओला यांना दिला आहे.