म.फु.कृ.विद्यापीठ राहुरी येथे प्रमुख प्रवेश द्वारावर सफाई कर्मचारी संघटणेचे बेमुदत प्राणांतीक आमरण उपोषण सुरू.

म.फु.कृ.विद्यापीठ राहुरी येथे प्रमुख प्रवेश द्वारावर सफाई कर्मचारी संघटणेचे बेमुदत प्राणांतीक आमरण उपोषण सुरू.

राहुरी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण

     महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कायम सेवेत असलेले सफाई कामगार १ ) पृथ्वी चंद्रशेखर बिवाल २ ) अनिल आनंद बुंबक३ ) सुखदेव माधव बिवाल विद्यापीठ अभियंता यांचे अधिनस्त काम करत आहेत त्यांची विद्यापीठ प्रशासनाने कराड . कोल्हापूर , मुक्ताईनगर चा ठिकाणी तातडीने बदली करून तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश पारित केले या कर्मचाऱ्यांनी सदर बदली रद्ध करण्याचे विनंती अर्ज करूनही बदली आदेश कायम ठेवले म्हणुन सदरचे कर्मचारी मः फु . कृ वि विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण आरंभले असुन तसे पुर्व निवेदन विद्यापीठ प्रशासनास दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की आमची बदली बेकायदेशीर असल्याने तात्काळ रद्ध करून आम्हाला पुन्हा विद्यापीठाचे मध्यवर्ती ठिकाणी पुन्हा कामावर रुजु करून घ्यावे या उपोषणास पाठींबा म्हणुन इतर सर्व स्वच्छक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे विद्यापीठाचे मिस्तरी रविराज राठोड व रंगनाथ आवटी यांनी पदाचा धाक दाख वुन हाताने मैला उचलण्यास सांगीतले हे दोन कर्मचारी स्वच्छ कांना सतत त्रास देत आसुन विद्यापीठ अभियंता ही त्यांचेच ऐकत आहेत 

     भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष तानसेन बिवाल म्हणाले कि सन २००६ चे शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१ वर्ग -ड मधील कर्मच्याऱ्यांच्या बदल्या करता येत नाहीत तरिही ह्या बदल्या केल्या असुन त्या बेकायदेशीर आहेत सदर बदल्या रद्ध न झाल्यास तिव्र अंदोलन केले जाईल असा इशारा तानसेन बिवाल यांनी दिला आहे तर अन्यायकारक बदल्या रद्ध होईपर्यंत उपोषण सोडणार नाही असे उपोषणार्थानी सांगीतले विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कुलगुरू व कुलसचिव हे विद्यापीठ मध्यवर्ती ठिकाणी उपस्थीत नसल्याचे सांगण्यात आले आहे.