शिंगणापूर येथे बालविवाह लावणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल.
शिंगणापूर येथे बालविवाह लावण्याच्या घटनेवरून सात जणांवर गुन्हा दाखल.
शिंगणापूर ता नेवासा येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्यावरून दोन्ही कुटुंबातील ७ सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिंगणापूर घोडेगाव रस्त्यावरील वस्तीवर विवाह झाला असल्याची गुप्त माहिती शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना मिळालेवरून त्यांनी शिंगणापूरचे ग्रामसेवक व पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याबद्दल सात आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत शिंगणापूरचे ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी दादासाहेब नारायण बोरुडे यांनी फिर्याद दिली की दि. २४ रोजी दुपारी १ वाजता मुलगी १८ वर्ष वयापेक्षा कमी असल्याचे माहित असूनही बालविवाह लावला असल्यावरून आरोपी आई,वडील(शनिशिंगणापुर)त सेच
बाबासाहेब सखाहारी जाधव रा. बोधेगाव, वैभव बाळासाहेब शुक्रे रा. वांजोळी यांच्यावर शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १४९/२०२२ बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम २००७ चे कलम ९,१०,११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल माळवे पुढील तपास करत आहे