आवार गावात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची सरपंचासहित नागरिकांनी घेतली शपथ .
*आवार गावात फटाके मुक्त दिवाळी साजरी करणार*
प्रतिनिधी मोहन शेगर
जळगाव:-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेस फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले असुन त्या नुसार जळगाव तालुक्यातील आणि जळगाव शहरापासून अंदाजे १५ किमी अंतरावर असलेल्या आवार या गावात अंदाजे ७०० वस्ती असलेल्या नागरिकांनी फटाके मुक्त अथवा कमीत कमी प्रदूषण करून साजरी करण्याचे ठरविले असुन त्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली.
फटाके मुळे ध्वनी आणि वायू प्रदुषण होते. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचे विकार होतात व त्यामुळे अनेक प्रकारच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात आणि पर्यावरणचे नुकसान होते. फटाक्यांमुळे प्राणी, पक्षी घाबरतात असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे .
या शपथविधी प्रसंगी जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन चे प़तिनिधी मदन लाठी, आवार गावाचे सरपंच श्री गोकुळ सपकाळे, उपसरपंच श्री संजय दादा सपकाळे, माजी सरपंच श्री सुनील सपकाळे, पोलीस पाटील श्री पुरुषोत्तम चौधरी, शुभम सपकाळे महिला बचत गटाचे अध्यक्ष सविता ताई , चंदाताई चौधरी, माय माता फाउंडेशन चे प़भावती पाटील, आदी ग़ामस्थ, महिला व शाळेतील मुलं उपस्थित होते.