काटोल येथील अर्जुन नगरात भगवान बुद्ध मुर्तीचे अनावरण

1.

काटोल येथील अर्जुन नगरात भगवान बुद्ध मुर्तीस्थापना कार्यक्रम उत्साहात संपन्न, महिला भगीनीनी अथक परिश्रम घेवुन लोकसहभागातून बौद्ध विहार बांधुन केली बुद्ध मूर्तीची स्थापना भव्य मिरवणूक काढुन भीक्खु संघाच्या व नगर परिषद काटोल चे माजी सभापती दिगांबर डोंगरे.यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी नगर सेवक सुभाष कोठे मनोज पेंदाम प्रा विरेंद्र इंगळे व शेकडो अनुयायांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.

भंते सारीपुत्र व भंते धम्मरक्षित यांनी परीत्रान पाठ व धम्मदेसणा देवून मूर्तीची स्थापना केली तर सुभाष कोठे मनोज पेंदाम प्रा विरेंद्र इंगळे यांनीही यावेळेस मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सांगितले की "बुद्ध वीहारे.गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी खुले झाले पाहिजे " जेणेकरून सुशिक्षित शिलवाण व बुद्ध विचाराची पिढी घडण्यास मदत होइल असे मत दिगांबर डोंगरे यांनी मांडले,यावेळेस विहार बांधण्यापासुन ते मुर्ती स्थापनेपर्यँतची भुमिका महिला आघाडीच्या प्रमुख ज्योत्स्ना धवराळ यांनी प्रास्तेवीकेतुन सांगितले

संचालन मंगला ढोणे यांनी तर आभार कdल्पना चnक्रपाणी यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंगला ढोणे कल्पना चक्रपाणी विमल खोब्रागडे निर्मला मेश्राम सुमित्रा डोंगरे निर्मला ढोके वैशाली ढोणे अनिता ढोणे यांच्यासह लक्ष्मण ढवराळ टिपू ढोने भिमराव खोब्रागडे यांनी अथक प्रयत्न केले.