क्षयरोग दिनाचे औचित्य साधून म्युर मेमोरियल हॉस्पिटलद्वारे एनएचएम अंतर्गत फिरते वैद्यकीय पथकानी 47 गावात मोफत तपासणी...
बी.पी.एस न्युज नेटवर्क,दिल्ली
तालुका प्रतिनिधी:- मयुर बाबु कुमरे
काटोल:- म्यूर् मेमोरियल द्वारा सचालित् फिरते वैदयकीय पथक नागपूर . नागपूर जिल्हातील दर महिन्याला काटोल, नरखेड ,कळमेश्वर या तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील 47 गावाना आरोग्य सेवा दिली जाते. त्या मध्यें गरोदर माता ,स्तनदा माता , लहान् बालके,वयोवृद्ध ,इतर रूग्णांची तपासणी करतात.
या पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी डाॅ.स्मिता एस.वाघमारे, फार्मसिस्ट प्रियंका आडे ,अधिपरिचारिका
प्रियंका लांडगे, पॅथॉलॉजिस्ट संचिता खरपकर, वाहनचालक
प्रवीण वानखेडे - युवराज ठाकरे,_ इत्यादी पदाधिकारी रुग्णांना सेवा देत असतात. या आरोग्य तपासणी पथकामार्फत नागपूर जिल्ह्यातील 47 गावांमधील दिनांक 24 मार्च गुरुवार ला खलानगोदी यागावांमध्ये भेट देऊन आरोग्य तपासणी करण्यात आली .
सदरपथक हे दर महिन्याला ठरलेल्या दिवशी प्रत्येक गावांमध्ये भेट देतात,--चिखला गड, मोहोगाव ढोले, पांढर ढाकणी , खडकी, चौरे पठार, घुबडी, खापा सोनार, गणेशपुर, बिहाल गोंदि, कातला बोडी, शेखापुर, काल मुंडा, लाखोळी ,कोहली, मालेगाव तसेच कळमेश्वर तालुक्यातील लढाई, खैरी लाखामा , आलेसुर , केतापर, आणि तसेच नरखेड तालुक्यातील एरंडा, खुशलापुर, दिनदरगाव, वाडेगाव,खेडी खुर्द, खरबडी, उमरी, बोपापुर , परसोडी दीक्षित, पानवडी, मयावाडी ,उतारा, साईवाडा , खलानेगोंदी ,तारा, हिवरमठ, आरंभी अंबाडा, बानोर चंद्र, पिंपळधरा , शेंबडा , सारडी या सर्व गावांचा समावेश आहे ..