मुळा उजवा कालव्याच्या दुरुस्तीसाठी 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर.आमदार शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्याला यश.
प्रतिनिधी संभाजी शिंदे
मुळा उजवा कालव्याच्या दुरुस्तीसाठी 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर.
आ शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्याला यश.
लवकरच निविदा प्रक्रियेस होणार सुरुवात.
सोनई प्रतिनिधी
नेवासा ,राहुरी,शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील शेतकरी, जनतेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुळा धरणावरील मुख्य कालवा, शाखा कालवा व त्यावरील वितरिका यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती त्यामुळे रोटेशन कालावधीत पाणी वेळेवर मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या त्यामुळे शेतकरी बंधावाची रोटेशन कालावधीत पाण्याची मोठी गैरसोय होत होती.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी आग्रही भूमिका घेणाऱ्या माजी मृद व जलसंधारण मंत्री आ शंकरराव गडाख यांनी मा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे मुळा धरणाचा 52 किमी लांबीचा मुख्य उजवा कालवा,30 किमी लांबी असलेल्या 4 उपशाखा व त्या अंतर्गत
येणाऱ्या 15 ते 20 किमीच्या वितरीका यांची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा असा अभ्यासपूर्वक प्रस्ताव तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे सदर केला होता त्यानुसार मा जलसंपदा मंत्री जयंत पाटील व मा मृद व जलसंधारण मंत्री यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थित मुंबई येथे मंत्रालयात डिसेंबर 2021 मध्ये बैठक घेण्यात आली व
मुळा धरणाचा 52 किमी लांबीचा मुख्य उजवा कालवा,30 किमी लांबी असलेल्या 4 उपशाखा व त्या अंतर्गत
येणाऱ्या 15 ते 20 किमीच्या वितरीका यांसाठी मुख्य उजवा कालवा हेड टू टेल दुरुस्ती,शाखा व वितरीका दुरुस्ती ,जुने बांधकाम दुरुस्ती,भराव मजबुतीकरण,आवश्यक त्या ठिकाणी अस्तरीकरण या कामासाठी 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे अशी माहिती आ शंकरराव गडाख यांनी दिली.यावेळी बोलतांना शंकरराव गडाख म्हणाले की शेतकरी बांधवांची गेल्या अनेक वर्षांपासून मुळा उजवा कालवा, शाखा व मुख्य वितरीका यांची दुरुस्ती व्हावी ही मागणी होती.
अनेक वेळा चालू रोटेशमध्ये कालवा फुटणे,कालव्यास असलेली गळती, वितरिका यांची पाणी वाहून नेण्याची कमी झालेली क्षमता यामुळे रोटेशन वेळेवर होऊनही टेलपर्यत पाणी मिळण्यास अडचणी येत होत्या.मुळा उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे हेड टू टेल पाणी वेळेत मिळणार आहे,कालवे,शाखा व वितरीका यांमधून पाणी पूर्ण दाबाने जाईल व त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत पाणी उपलब्ध होऊन पिके चांगली येण्यास उपयोग होणार आहे,अनावश्यक ठिकाणी होणारी पाण्याची गळती थांबेल त्यामुळे कमी कालावधीत रोटेशन होईल.
सदर काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने व वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी स्वतः लक्ष घालून काम पूर्ण करणार आहे असेही आ शंकरराव गडाख म्हणाले.
आ शंकरराव गडाख यांनी विशेष प्रयत्नपूर्वक उजवा कालवा दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून आणल्याबद्दल नेवासा तालुक्यासह इतर लाभधारक तालुक्यातील शेतकऱ्यांनी आ शंकरराव गडाख यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
आ शंकरराव गडाख यांनी विशेष प्रयत्नपूर्वक मुळा उजवा कालव्यास निधी मंजूर करून आणल्याने वेळोवेळी कालवा फुटून रोटेशन काळात कालवा बंद करावा लागणार नाही व कालव्याच्या दुरुस्तीमुळे शेतकऱ्यांना टेल पर्यत पाणी मिळण्यास मदत होईल.