उसाचा गळीत हंगाम सुरू झाल्याने शेवगाव शहरातील वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. शहरात वाहतुकीची कायम कोंडी असते यामुळे शहरातून होणारी ऊस वाहतूक पर्यायी मार्गाने वाळवावीत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्याकडे केली आहे.
ता शेवगाव:-उसाचा गळीत हंगाम सुरू झाल्याने शेवगाव शहरातील वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे आत्ताच शहरातील वाहतुकीची कायम कोंडी असते. यामुळे शहरातून होणारी ऊस वाहतूक पर्याय मार्गाने वळवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त की शेवगाव शहरातील शेवगाव तालुक्यातील रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली असून यातच ऊस तोडीचा हंगाम सुरू होत आहे शहरात वाहतूक समस्या आधीपासूनच मूळ धरून आहेत त्यात साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला की अपघात वाहतूक कोंडी यांच्या समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने गळीत हंगामासाठी मास्टर प्लॅन तयार करावा प्लॅन केल्याने मार्गावरूनच ऊस वाहतूक करावी. लोकनेते मारतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना. गंगामाई साखर कारखाना. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना. केदारेश्वर साखर कारखान्याच्या ऊस वाहनांना गळीत हंगामासाठी मार्ग निश्चित करण्यात यावा.
शहरात प्रवेश नाकारून बाह्य मार्गावरून ऊस वाहतूक सुरू करण्यात यावी सदर पर्यायी मार्गाची दुरुस्ती या सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्याच्या सी ए आर फंडातून पर्यायी वाहतुकीसाठी लागणाऱ्या मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी. जेणेकरून शेवगाव शहरातील वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच अपघाताच्या घटनांवर देखील नियंत्रण येईल अनेक ऊस वाहतूक करणारी वाहने नादुरुस्त झाल्याने रस्त्यावरच उभी असतात रात्री अपरात्री ही वाहने रस्त्यावर उभी असल्याने अंधारात दिसून येत नाहीत यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या या वाहनावर रेडियम अथवा रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक करावे. याबाबत आपण व सर्व ऊस कारखाना प्रशासनाने गांभीर्याने विचार करून याबाबत तातडीने पावले उचलावीत अशा चे निवेदन मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्याकडे दिले असून निवेदनाच्या प्रती तहसीलदार शेवगाव व सर्व साखर कारखान्याच्या प्रशासनाला देखील पाठवण्यात आले आहे. या शिष्टमंडळात मनसेचे शेवगाव तालुका उपाध्यक्ष देविदास हुशार. विभागाध्यक्ष सुनील काथवटे. शहर उपाध्यक्ष संदीप देशमुख. मंगेश लोंढे. ज्ञानेश्वर कुसळकर. गणेश डोमकावळे. आमिन सय्यद. मच्छिंद्र भडके. विठ्ठल दुधाळ. यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.