शेवगाव तालुक्यात खरडगावात शॉर्टसर्किटने दहा एकर ऊस जळुन खाक.

शेवगाव तालुक्यात  खरडगावात शॉर्टसर्किटने दहा एकर ऊस जळुन खाक.

ता. शेवगाव :-खरडगाव येथे मंगळवारी दुपारी ऊसाला आग लागली शा्ट सर्किटने लागलेल्या आगीत पाच शेतकऱ्यांचा दहा एकरातील ऊस जळून खाक झाला. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र वाऱ्यामुळे आग विझवण्यात अपयश आल्याने पाच शेतकऱ्यांचा ऊस जळून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शेतातून गेलेल्या महावितरणाच्या वीज वाहकतारांच्या शॉर्टसर्किटने आग लागली या आगीमध्ये ज्योती कल्याण बोडके यांचा दीड एकर. साहेबराव किसन काकडे यांचा अडीच एकर. गोरक्ष काशिनाथ काकडे यांचा दोन एकर. एकनाथ वामन लवांडे यांचा अडीच एकर. रामा आसरा जी काकडे यांचा दीड एकर.असा सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाला.

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ॲग्री सुपरवायझर संजय आरगडे फीडमन काकासाहेब लबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने दखल घेत बुधवारी ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या पाठवून ऊस तोडून नेण्यास सुरुवात केली आहे.