सौ. मीनाक्षी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्यामार्फत मॅथ जीनियस स्पर्धा संपन्न.

*केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्यामार्फत मॅथ जीनियस स्पर्धा संपन्न.*
नेवासा तालुका (प्रतिनिधी युनूस पठाण) :- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे ओम प्रो ऍक्टिव्ह अबॅकस च्या संचालिका सौ.मीनाक्षी लक्ष्मण मुंगसे व लक्ष्मण मुंगसे सर यांच्या विशेष प्रयत्न व मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद केंद्र शाळा अंतर्गत शाळेमध्ये केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्यामार्फत मॅथ जीनियस ओलंपियाड सण 2024 - 2025 परीक्षा घेण्यात आली.
या प्रशिक्षणाचा हाच हेतू आहे की ग्रामीण भागातील मुलांना शहरी भागासारखं आधुनिक ज्ञान मिळावं व ग्रामीण भागातील मुले हुशार होऊन मोठ्या हूद्यापर्यंत जावे. वेगवेगळ्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त करून जीवनात यशस्वी व्हावे . त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास व्हावा म्हणून सौ .मीनाक्षी लक्ष्मण मुंगसे मॅडम ह्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून मुलांना शैक्षणिक जीवनात संधी देण्याचे काम करतात.
त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गावठाण येथे मुख्याध्यापक सतीश भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली तर तांबे वस्ती जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक कचरे सर , मुंगसे वस्ती लाल गेट मुख्याध्यापक पेहेरे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवी वस्ती मुख्याध्यापक तिजोरे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनसोडे वस्ती मुख्याध्यापक संजय गर्जे सर , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोयकर वस्ती मुख्याध्यापक चांडे सर तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापक विठ्ठल कदम सर अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड या सर्व मुख्याध्यापकाच्या अधिपत्याखाली ही परीक्षा घेण्यात आली.
निकाल लागल्यानंतर सौ. मीनाक्षी मॅडम यांच्या उपस्थितीत जे मुलं प्रथम स्थानी अग्रगण्य होते त्यांना गोल्ड मेडल दुसऱ्या टप्प्यातील मुलांना सिल्वर मेडल व सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. की याचा उद्देश आहे की भविष्यात मुलांना प्रेरणा चेतना मिळावी मुलांनी वारंवार या जीनियस परीक्षेमध्ये भाग घेऊन आपल्या बुद्धीचा विकास करावा. व मुलांनी कौशल्य जपत संधीचे सोने करावे असे मॅडम यांनी म्हटले. तर या प्रशिक्षण केंद्राच्या वतीने व ओम प्रो ऍक्टिव्ह अबॅकस च्या वतीने सर्व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.
सौ मीनाक्षी मॅडम व लक्ष्मण मुंगसे सर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये मोलाचा वाटा घेऊन गावातील विद्यार्थी घडावे सुजाण नागरिक बनावे. म्हणून अथक प्रयत्न करत आहेत म्हणून त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.