नेवासा तालुका जगाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू -सूर्यभान आघाव, खेडले परमानंद.

नेवासा तालुका जगाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू -सूर्यभान आघाव, खेडले परमानंद.

प्रतिनिधी संभाजी शिंदे ,खेडले परमानंद

          ज्येष्ठ सेंद्रिय शेती तज्ञ सूर्यभान वाघोजी आघाव खेडले परमानंद यांनी नेवासा तालुक्या विषयी त्यांचे विचार  सुंदर व विचार करावा अशा स्वरूपात व्यक्त केले यावेळी बोलताना ते म्हणाले की.

मी एका कीर्तनात ऐकले की , नेवासे हे पूर्ण जगाचे मध्यवर्ती केंद्र आहे आणि मग मी त्यावर विचार केला. आणि ते मलाही पटले ....

पूर्वी देव दानव यांनी समुद्रमंथन केलं त्यातून 14 रत्न निघाले पहिले रत्न विष ते भगवान शंकरांनी प्राशन केले. तर शेवटचे जे अमृत निघाले त्यावरून देव दानव आपापसात भांडू लागले .त्वरित भगवान विष्णूंनी मोहिनिरुप घेऊन तेथे प्रकटले. सर्वांना त्यांनी सांगितले की मी तुम्हाला अमृत वाटते तुम्ही दोन रांगा मध्ये बसा, एक रांग देवाची तर एक रांग दानावाची ची असेल .त्यावेळी रांगेला अळी म्हणायचे .देवाची अळी जिथे बसली त्या ठिकाणाला देवळाली नाव पडले . अमृत वाटप चालू असताना एक राहू नावाचा दानव देवाच्या अळीत (त्यावेळी रांगेला अळी असा म्हण्याचे ) रांगेत येऊन बसला आणि ते विष्णूच्या लक्षात येताच त्यांनी त्याचे मुंडके उडवले ...ही घटना ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणाला आताची राहुरी म्हटले जाते .

यानंतर भगवान विष्णू मोहिनिरुपात नेवासाला येऊन थांबले .आजही या घटनेची साक्ष देत तेथे मोहिनिराज मंदिर उभे आहे .याच तालुक्यात जागतिक पातळीवरील भव्य देवस्थान शनी देवाचे शिंगणापूर आहे.या ठिकाणी कधीही चोरी होता नाही आणि याची साक्ष म्हणजे येथील एकही घराला दरवाजा नाही .

त्या शेजारी सोनई गाव ...गोरक्षनाथ यांनी सोन्याची विट टाकली म्हणून या गावाचे नाव सोनई पडले. एका मुलाचे नाव ज्ञानेश्वर ठेवले .तोच मुलगा 16 व्या वर्षात जगाला ज्ञान देणारा ज्ञानदेव झाला. जेथून त्याने "सारे विश्वाची माझे घर" ही शिकवण अख्या जगाला दिली . असा हा नेवासा तालुका .

याच तालुक्यातील खेडले परमानंद या ठिकाणी कवीश्वर परमानंद बाबा यांनी शिवभारत हा ग्रंथ लिहिला.पूर्वी लोक सांगतात , कुणाला पैश्याची गरज भासली की बाबांच्या मठात जाऊन वायदा करायचा .त्या ठिकाणी असलेली देवळीत हात टाकला की हवे तेवढे पैसे मिळायचे .आणि वायदा चुकला तर एक वाधी अन् एक सोट्या हवाई मार्गाने जाऊन पैश्याची वसुली करत. काही कुजबुज केल्यास वाधी हात बांध्याची आणि सोटया मार द्याचा .

दुसरा चमत्कार म्हणजे मठाच्या शेजारी एक लिंबाचे झाड होते त्या ची जी फांदी मठावर यायची तीच पाला अतिशय गोड आणि बाकी झाडाचा पाला कडू. या मठाला शिवाजी महाराजांनी भेट दिली होती .या शेजारील गाव "बेलेखरवडी "त्याठिकाणी हरिहरानंद महाराजांना रेणुका देवी प्रसन्न झाली . त्या ठिकाणी डोळे दिपून टाकणारे भव्य काच मंदिर आहे. अजून एक ठिकाण म्हणजे किसनगिरीबाबा देवगड .1972 साली आम्ही गावातील 2-४ जन दर्शनासाठी गेलो असता बाबांनी विचारपूस केली. कुठून आले ...तेव्हा खेडल्याचे नाव ऐकताच बाबा म्हणाले एवढ्या जवळच सोडून इतकं दूर कशापायी आले आहेत...मी आत्ताच परमानंद बाबा कडे जाऊन आलोय. आज त्या ठिकाणी भसकर्गिरी महराजच्या अधिपत्याखाली भव्य देवस्थान विशेष प्रगतीपथावर आहे.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत "जेजुरीचे खंडोबा " यांची पहिली राणी म्हाळसा देवी चे माहेर याच तालुक्यात होते ..आणि या तालुक्याचं नेतृत्व करण्याचं भाग्य मा.यशवंतराव गडाख यांना भेटलं ..आणि या संधीच त्यांनी अगदी सोनं केलं .इतक्या सर्व भव्य ऐतिहासिक गोष्टीचा पाठपुरावा करणारा नेवासा तालुका खरंच जगाच मध्यवर्ती केंद्र असावं या निष्कर्ष ला पोहचलो.

              - सूर्यभान आघाव

 

.